Home /News /sport /

VIDEO : हा छोटा बघा हाताच्या मदतीने काढतो धावा, साक्षात सचिनही झाला थक्क!

VIDEO : हा छोटा बघा हाताच्या मदतीने काढतो धावा, साक्षात सचिनही झाला थक्क!

सचिन म्हणतो,'लहानग्याकडून प्रेरणा घ्या'; शेअर केला हाताच्या मदतीने धावा काढणाऱ्या दिव्यांग रामचा VIDEO

    मुंबई, 01 जानेवारी : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सचिनने नव्या वर्षात प्रेरणा देणाऱा हा व्हिडिओ पाहून सुरुवात करा असं म्हटलं आहे. सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओमधील मुलाचे नाव मद्दा राम असं सांगितलं आहे. दिव्यांग असलेल्या मद्दा रामचा क्रिकेट खेळत असलेला हा व्हिडिओ तुमचंही मन जिंकेल असं सचिन म्हणाला आहे. दिव्यांग असुनही क्रिकेट खेळताना तो हातांच्या मदतीने धावताना दिसत आहे. स्ट्राइक बदलल्यानंतर पुन्हा बॅट परत देण्यासाठीही तो सर्वसामान्यांप्रमाणे खेळपट्टीच्या मध्यापर्यंत गेला. त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत असलेला दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे. सचिनने शेअर केल्यानंतर त्यावर अनेकांनी या मुलाचे कौतुक केलं आहे. त्याच्या जिद्दीला सलाम केला आहे. सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. तो सतत काही ना काही शेअर करत असतो. काही जुन्या आठवणी, क्षण तो व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असतो. गेल्याच महिन्यात त्याने 19 वर्षांपूर्वी एका वेटरने दिलेल्या सल्ल्याची आठवण सांगितली होती. त्याला शोधून देण्यासाठी मदत करा असं आवाहनही केलं होतं. काही वर्षांपूर्वी चेन्नईतील एका हॉटेलमध्ये वेटरसोबत झालेल्या भेटीचा उल्लेख सचिनने केला होता. त्या वेटरला शोधण्यासाठी सचिनने लोकांची मदत मागितली होती. वेटरशी झालेल्या भेटीत एक सल्ला सचिनला मिळाला होता. त्यानंतर फलंदाजीच्या शैलीत झाला होता. सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे की, एका कसोटी मालिकेवेळी चेन्नईतील ताज कोरोमंडल हॉटेलमधील एक वेटर भेटला होता. त्यावेळी आर्म गार्डबद्दल त्याच्याशी चर्चा झाली होती. त्यात वेटरनं आर्म गार्डचं डिझाईन बदलण्याचा सल्ला दिला होता. सोशल मीडिया युजर्स तुम्ही त्याला शोधण्यासाठी माझी मदत करू शकता का? असंही सचिनने विचारलं होतं.
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या