मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

M S Dhoni की Sachin Tendulkar, कोणाकडे आहे सर्वात महागडी कार? पाहा PHOTOS

M S Dhoni की Sachin Tendulkar, कोणाकडे आहे सर्वात महागडी कार? पाहा PHOTOS

Indian Cricketers Car Collection: एम. एस. धोनी हा जसा तडाखेबंद खेळासाठी ओळखला जातो, तसाच तो महागड्या कारच्या कलेक्शनसाठी देखील परिचित आहे.

Indian Cricketers Car Collection: एम. एस. धोनी हा जसा तडाखेबंद खेळासाठी ओळखला जातो, तसाच तो महागड्या कारच्या कलेक्शनसाठी देखील परिचित आहे.

Indian Cricketers Car Collection: एम. एस. धोनी हा जसा तडाखेबंद खेळासाठी ओळखला जातो, तसाच तो महागड्या कारच्या कलेक्शनसाठी देखील परिचित आहे.

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : देशात अभिनेते, अभिनेत्रींनंतर क्रिकेटपटूंचे (Cricketers) फॅन फॉलोअर्स (Fan Followers) सर्वाधिक आहेत. क्रिकेटपटूंचं खासगी आयुष्य कसं आहे, मैदानावर आणि खासगी आयुष्यात ते कोणत्या गोष्टी वापरतात, याविषयी त्यांच्या फॅन्सना कमालीची उत्सुकता असते. क्रिकेटपटूदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून (Social Media) आपल्या फॅन्ससोबत वैयक्तिक आयुष्यातले किंवा मैदानावरचे किस्से फोटो किंवा व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करत असतात. आपला आवडता क्रिकेटपटू खासगी आयुष्यात कोणत्या वस्तू, गाड्या वापरतो हादेखील फॅन्ससाठी चर्चेचा विषय असतो.

गेल्या काही वर्षात क्रिकेटपटूंचं कार कलेक्शन (Car Collection) हादेखील औत्सुक्याचा विषय ठरला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी (Mahendra singh Dhoni) महागड्या कार कलेक्शनसाठी विशेष प्रसिद्ध आहेत.

एम. एस. धोनी हा जसा तडाखेबंद खेळासाठी ओळखला जातो, तसाच तो महागड्या कारच्या कलेक्शनसाठी देखील परिचित आहे. तसंच तो बाइक्सचाही (Bike) चाहता आहे. त्याच्याकडे काही सुपर ग्लॅमरस टू-व्हीलर्स आहेत. एम. एस. धोनीनं महागड्या कार्स त्याच्या रांचीमधल्या हवेलीत ठेवल्या आहेत. V8 क्लॉक इंजिन आणि हर्स्ट शिफ्टरसह 4 स्पीड Muncie ट्रान्समिशननं सुसज्ज असलेली लाल रंगाची कार सर्वांचं लक्ष वेधून घेते. ही व्हिंटेज कार (Vintage Car) प्रत्येक कारप्रेमीनं पाहावी अशी आहे.

धोनीकडच्या पॉर्श्चे 911ची (Porsche 911) किंमत 2.50 कोटी रुपये आहे. एम. एस. धोनी हा नेहमीच सर्वोत्कृष्ट गोष्टी मिळवताना कोणतीच तडजोड करत नाही. हे त्याच्या ऑटोमोबाइल कलेक्शनवरूनही दिसतं. पॉर्श्चे 911चा वेग जबरदस्त आहे. ही कार 4.5 सेकंदांत 1-100 किलोमीटर प्रतितास हा वेग धारण करू शकते. या कारचा सर्वोच्च स्पीड 306 किमी/ प्रतितास आहे.

 रांची. टीम इंडिया के पूर्व कप्तान और विकेटकीपर एमएस धोनी (MS Dhoni) भले ही आजकल मैदान से दूर हैं लेकिन वो फिर भी मीडिया में छाए रहते हैं. धोनी एक बार फिर सुर्खियों में हैं और इसकी वजह है धोनी की नई गाड़ी. एमएस धोनी ने जीप कंपनी एक नई कार खरीदी है, जिसका नाम ग्रैंड चिरोकी (Jeep Grand Cherokee) है.

या व्यतरिक्त एम. एस. धोनीच्या कलेक्शनमध्ये जीप ग्रॅंड चेरोकी एसआरटी ट्रॅकहॅक (Jeep Grand Cherokee SRT Track Hack) ही लेटेस्ट गाडीही समाविष्ट आहे. जीप ग्रॅंड चेरोकी खरेदी करणारा धोनी हा पहिला भारतीय ठरला आहे. ही जीप ह्यमोंगस कारच्या मालकीच्या फ्लॅगशिप एसयूव्हीचं (SUV) सर्वोत्तम उत्पादन आहे. 6.2 लीटर V8 इंजिनसह येणारी ही जीप 475 बीएचपीपेक्षा अधिक पॉवर आउटपुट जनरेट करते. या जीपचं वजन 2 टन असलं तरी वेगावर कोणताही परिणाम होत नाही. ही जीप 0-100 किमी/ प्रतितास वेग केवळ 3.5 सेकंदांत गाठू शकते. धोनीनं ही शानदार एसयूव्ही 1.39 कोटी रुपयांना खरेदी केली आहे.

धोनीकडे आहे आता एकापेक्षा एक आलिशान गाड्या, पाहा हे PHOTOS

Ferrari 360 Modena (फोटो सौजन्य : Team-BHP)

Ferrari 360 Modena (फोटो सौजन्य : Team-BHP)

सचिन तेंडुलकरकडे किती भन्नाट गाड्या आहेत, पाहून व्हाल थक्क!

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं केल्यानं सचिन तेंडुलकरला फियाट इंडियाकडून खास भेट म्हणून फेरारी मोडेना (Ferrari Modena) ही महागडी कार देण्यात आली होती. या कारची किंमत 1.1 कोटी रुपये आहे. त्या काळी ही रक्कम फार मोठी मानली जात असे. 3.6 लीटर V8 इंजिन 395 एचपी पॉवर आणि 372 एनएम टार्कसह ऑपरेट होणारी ब्राइट लाल रंगाची ही कार सचिननं काही वर्षं वापरली आणि त्यानंतर ती विकून टाकली.

modified BMW i8. (फोटो सौजन्य : Darshan Shinde Photography)

modified BMW i8. (फोटो सौजन्य : Darshan Shinde Photography)

बीएमडब्ल्यू i8 (BMW i8) ही मनमोहक आणि प्रसिद्ध कार सचिन तेंडुलकरकडे आहे. ही आलिशान कार सचिनच्या आवडीनुसार डीसी डिझाइननं तयार केली आहे. बीएमडब्ल्यू स्पोर्ट्स कार उत्तम असून, सुपर कूल कस्टमाइज्ड एक्सटीरियरमुळं ती अधिक उत्कृष्ट दिसते. या लक्झरी कारमध्ये 1.5 लीटर, 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे. त्यातून 362 बीएचपी पॉवर आणि 570 एनएम टॉर्क आउटपुट मिळतं. प्राइस टॅगमध्ये 2.5 कोटी ते 3 कोटी रुपयांचा उल्लेख आहे. सचिन मुंबईच्या रस्त्यांवर या शानदार कारमधून प्रवास करताना अनेकदा दिसतो.

First published:

Tags: Car, MS Dhoni, Sachin tendulakar, Team india