भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेल्या माही अर्थात महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. धोनी म्हणजे विजयाची शंभर टक्के हमी असं समिकरणच तयार झालं होतं. मॅच फिनिशर म्हणून माही जगात एक नंबरचा खेळाडू. धोनीला क्रिकेट व्यतिरिक्त आलिशान गाड्यांचा भारी हौस आहे. त्याच्याकडे महागड्या दुचाकी ते चारचाकी गाड्यांचे चांगलेच कलेक्शन आहे.
धोनीकडे असलेली Nissan Jonga ही 1 Ton नावाने ओळखली जाते. पण ही निसान 4W70 सीरीजमधील गाडी आहे. या एसयुव्हीमध्ये कंट्रास्ट टॅन कलर सीट्स, ब्लॅक फिनिश डॅशबोर्ड आणि सेंट्रल कंसोल आणि एसी वेंट्स, स्टीयरिंग व्हिल दिले आहे. या निसान जोंगामध्ये 6-सिलिंडर पेट्रोल इंजिन दिले आहे. या गाडीत मॅन्युअल गियरबॉक्स दिला आहे.
Hellcat ही जगातली सर्वात सुंदर अशी बाईक आहे. ही बाईक एक पॉवर क्रुझर आहे, त्यामुळे तिचे डिझाईन हे इतर बाईक्सपेक्षा जरा हटके असे आहे. Hellcat ही लांब पल्याच्या प्रवासासाठी अशी खास बाईक आहे. पण धोनीने या बाईकला ट्रॅकवर पळवले. X132 Hellcat मध्ये थोडे थोडके नाहीतर तब्बल 2.2-लीटर V-Twin इंजिन दिले आहे. जे 121bhp आणि 190nm इतका टार्क जनरेट करतो.