जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / क्रिकेटर उमेश यादवची फसवणूक, मित्रानेच घातला लाखोंचा गंडा

क्रिकेटर उमेश यादवची फसवणूक, मित्रानेच घातला लाखोंचा गंडा

क्रिकेटर उमेश यादवची फसवणूक, मित्रानेच घातला लाखोंचा गंडा

उमेश यादवच्या मित्रानेच त्याला लाखो रुपयांचा गंडा घातला असून या विरोधात यादवने नागपूर येथील कोराडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यादवच्या मित्रा विरोधात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 जानेवारी : भारताचा फास्ट बॉलर उमेश यादव याची आर्थिक फसवणूक झाली आहे. उमेश यादवच्या मित्रानेच त्याला तब्बल 44 लाख रुपयांचा गंडा घातला असून या विरोधात यादवने नागपूर येथील कोराडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यादवचा मित्र आणि कधी काळचा मॅनेजर असलेल्या शैलेश ठाकरे त्याच्या विरोधात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. काय आहे नेमके प्रकरण :- उमेश यादव याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्याने त्याला देशात आणि विदेशात खेळण्यासाठी जावे नेहमी बाहेर रहावे लागत होते. त्यामुळे त्याने त्याचा मित्र असलेला आरोपी शैलेश ठाकरे याला पत्रव्यवहार, इन्कम टॅक्स, बँक आणि इतर व्यवहाराकरिता पगारी मॅनेजर म्हणून ठेवले होते. परंतु आरोपीने उमेश यादव यांची कोणतीही कामे केले नाही. तसेच उमेश यादव यांनी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कोराडी हद्दीतील एमएसईबी कॉलनी येथील स्टेट बँक शाखेतील खात्यात  एकूण 44 लाख रुपये ठेवले होते. ते 44 लाख रुपये शैलेश ठाकरे याने परस्पर काढून स्वतःच्या नावे प्रॉपर्टी खरेदी केली. उमेश यादव यांना त्यांचे पैसे देखील  परत न करून त्यांची फसवणूक केली. हे ही वाचा  : RCB संघाच्या ट्विटर अकाऊंटवर हॅकर्सचा कब्जा भारतीय क्रिकेटर उमेश यादव यांच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी शैलेश ठाकरेवर कलम 406 ,420 भादवी अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपी शैलेश ठाकरे चा शोध घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात