भारतीय संघातील खेळाडूंना अलिकडच्या काळात अनेक वेळा दुखापतींना सामोरे जावे लागले. यात इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, उमेश जाधव, आर. अश्विन, नवदीप सायनी, हनुमा विहारी यांना आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यांना दुखापतीमुळे मुकावे लागले होते.
हे देखील वाचा - सिराजचा खुलासा, सिडनी टेस्टमध्ये वर्णभेदी शेरेबाजीवर अंपायरने त्याला 'हे' सांगितलं भारताचे माजी प्रशिक्षक रामजी श्रीनिवासन म्हणाले, की या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. वेगवेगळ्या स्किल सेटसची वेगळी परीक्षा घ्यावी, अशी मागणी आम्ही क्रिकेटनेटकडे केली होती. कौशल्यानुसार आपल्याकडे आणखी वैशिष्ठे असणे आवश्यक आहे. प्रत्येक स्तरावर ऊर्जा प्रणाली भिन्न आहेत. त्यानुसार चाचणीचे नियम भिन्न असणे आवश्यक आहेत. मग आपण हे का करत नाही ? आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लड हे करत असल्याने आपण अशी चाचणी का अनिवार्य केली पाहिजे? आपले खेळाडू वेगळे आहेत. ही प्रत्येक स्तरावर वैयक्तिक करणे आवश्यक आहे. जीम ते फिल्ड या दरम्यानची कार्यक्षमता अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तंदुरुस्तीचा काही उपयोग नाही. यामुळे आपण 5 किलोमीटर 15 मिनिटात कापू शकतो किंवा 120 किलो वजन उचलू शकतो. मात्र हे फिल्डवर परावर्तित होते का? क्रिकेट हा सातत्याने खेळला जाणारा खेळ नाही. तो थांबून पुन्हा खेळला जातो. स्लिप किंवा कव्हरमध्ये उभ्या असलेल्या व्यक्तीला 10 षटकांपर्यंत चेंडू मिळत नाही. अचानकच त्याच्याकडे एखादा बाॅल येतो. त्याचे शरीर अधीच वाॅर्म डाऊन झालेले असते. त्यात त्याने हालचाली केल्या तर दुखापत होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे खेळाडू कसा अॅक्टिव्ह राहिल त्यानुसार तुम्हाला प्रशिक्षण घ्यावे लागेल. क्रिकेट हा स्टाॅप अॅण्ड गो पद्धतीचा खेळ आहे, पावर हिटिंग पद्धतीचा खेळ नाही. बॅटिंगचा वेग वाढवण्यासाठी वेगळ्या पध्दतीचे पाॅवर हिटींगचे प्रशिक्षण देता येणे शक्य आहे. यासाठी बेसबालच्या मदतीने वर्कआऊटस घेतले जातात. परंतु ते पुरेसे नसल्याने व्यायामाची स्मार्ट निवड आवश्यक आहे. बॅटसमनसाठी बाॅलर्स, आॅल राऊंडर्स आणि विकेटकिपर्सच्या तुलनेत तंदुरुस्तीचे घटक भिन्न असले पाहिजेत. क्रम आणि संयोजन हे सोपे नाही, ती एक अवघड प्रक्रिया आहे. पण ती चांगल्या समन्वयातून करणे आवश्यक आहे, असे श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Fitness, Team indian