द्विशतकी खेळीनंतरही विराटने केले संघाबाहेर! नाराज संजू सॅमसनने दिली पहिली प्रतिक्रिया

द्विशतकी खेळीनंतरही विराटने केले संघाबाहेर! नाराज संजू सॅमसनने दिली पहिली प्रतिक्रिया

बांगलादेश विरोधातील कसोटी मालिकेनंतर वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : बांगलादेश विरोधातील कसोटी मालिकेनंतर वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यात 6 डिसेंबरपासून टी-20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. यासाठी 21 नोव्हेंबरला भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यात एमएसके प्रसाद यांनी धक्कादायक निर्णय घेतले. घरच्या मैदानावर द्विशतकी खेळी करणाऱ्या संजू सॅमसनला संघात जागा दिली नाही. त्यामुळं पुन्हा एकदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये विकेटकिपींगची जबाबदारी ऋषभ पंतला देण्यात आली आहे.

वेस्ट इंडिज विरोधात होणाऱ्या मालिकेत कर्णधार विराट कोहलीनं कमबॅक केला आहे. त्याशिवाय वर्ल्ड कपनंतर जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमारलाही संघात स्थान दिले आहे. तर, मनीष पांडेलाही संघात कायम ठेवले आहे. मात्र घरच्या मैदानावर दमदार कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनला या मालिकेत संघात स्थान मिळाले नाही.

याआधी बांगलादेशविरोधात टी-20 संघात संजूला संघात स्थान देण्यात आले होते, मात्र एकाही सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळं दिग्गजांनी निवड समितीला फैलावर घेतले. दरम्यान भारतीय संघात निवड न झाल्यामुळे संजू सॅमननं पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली. संजूनं ट्वीट करत संघात निवड न झाल्याबद्द नाराजी व्यक्त केली.

वाचा-शमीच्या घातक बाउंसरचा शिकार झाला लिटन दास, मैदानातच आली चक्कर

वाचा-हिटमॅन बनला सुपरमॅन! रोहितनं विराटकडून हिसकावला कॅच, पाहा VIDEO

विजय हजारे ट्रॉफीमध्ये संजूची दमदार खेळी

केरळकडून खेळताना संजू सॅमसननं विजय हजारे ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी केली होती. विजय हजारे ट्रॉफीमध्ये यंदाच्या हंगामात द्विशतकी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला होता. त्याशिवाय सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चार सामन्यात आतापर्यंत 112 धावा केल्या आहेत. तर, आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून 93 सामन्यात संजूनं 27.61च्या सरासरीनं 2209 धावा केल्या आहेत. यात दोन शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय टीम इंडियाकडून 2015मध्ये शेवटचा सामना खेळला होता.

असा आहे भारत-वेस्ट इंडिज दौरा

6 डिसेंबर 2019 - पहिला T20I, मुंबई

8 डिसेंबर 2019 - दुसरा T20I, तिरुवनंतपुरम

11 डिसेंबर 2019 - तिसरा T20I, हैदराबाद

15 डिसेंबर 2019 - पहिला ODI, चेन्नई

18 डिसेंबर 2019 - दुसरा ODI, विशाखापत्तनम

22 डिसेंबर 2019 - तिसरा ODI, कटक

वाचा-वेस्ट इंडीजबरोबरच्या सीरिजसाठी भारताची टीम जाहीर, मोहम्मद शामी करणार कमबॅक

असा आहे भारताचा टी-20 संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, ऋषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी

असा आहे भारताचा वनडे संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, ऋषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2019 04:14 PM IST

ताज्या बातम्या