वेस्ट इंडीजबरोबरच्या सीरिजसाठी भारताची टीम जाहीर, मोहम्मद शामी करणार कमबॅक

वेस्ट इंडीजबरोबरच्या सीरिजसाठी भारताची टीम जाहीर, मोहम्मद शामी करणार कमबॅक

T20 सामन्यांची मालिका 6 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यापाठोपाठ ODI एकदिवसीय सामन्यांची मालिका भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान होईल.

  • Share this:

कोलकाता, 21 नोव्हेंबर : येत्या 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत - वेस्ट इंडीज सीरिजसाठी भारताची टीम जाहीर झाली आहे. भारताच्या निवड समितीचे प्रमुख MSK प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने भारताच्या संघात कोण कोण असेल ते जाहीर केलं.  T20 सामन्यांची मालिका 6 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यापाठोपाठ ODI एकदिवसीय सामन्यांची मालिका भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान होईल.

अशी आहे टी-20 मालिका

पहिला टी-20 सामना - 6 डिसेंबर (मुंबई)

दुसरा टी20 सामना- 8 डिसेंबर (त्रिवेंद्रम)

तिसरा टी20 सामना- 11 डिसेंबर (हैदराबाद)

अशी आहे वनडे मालिका

पहिला टी-20 सामना - 15 डिसेंबर (चेन्नई)

दुसरा टी20 सामना- 18 डिसेंबर (विशाखापट्टणम)

तिसरा टी20 सामना- 22 डिसेंबर (कटक)

असा आहे भारताचा टी-20 संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, ऋषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी

असा आहे भारताचा वनडे संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, ऋषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2019 07:41 PM IST

ताज्या बातम्या