मुंबई, 23 जुलै : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातल्या वनडे सीरिजला शुक्रवारपासून सुरूवात झाली. सीरिजचा पहिला सामना त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क ओव्हल मैदानात झाला. या सामन्यात टीम इंडियाचा 3 रनने रोमांचक विजय झाला. टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) या विजयाचा हिरो ठरला. टॉस हरल्यानंतर पहिले बॅटिग करत टीम इंडियाने 308 रन केले. धवनने 99 बॉलमध्ये 97 रनची खेळी केली, पण आपल्या 18व्या वनडे शतकापासून धवन 3 रननी कमी पडला. त्याने या खेळीमध्ये 10 फोर आणि 3 सिक्स मारले. या सामन्यात भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराजकडून (Mohammad Siraj) मोठी चूक होता होता राहिली. शेवटच्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला 15 रन वाचवायचे होते. रोमारिया शेफर्ड 31 आणि अकील हुसैन 32 रनवर खेळत होते. पहिले चार बॉल चांगले टाकल्यानंतर सिराजने पाचवा बॉल चुकीच्या ठिकाणी टाकला. शेफर्डने स्टम्प सोडून मारण्याच्या तयारीत असल्याचं बघून सिराजने लेग साईडच्या दिशेने बॉल टाकला. विकेट कीपर संजू सॅमसनने (Sanju Samson) उडी मारून हा बॉल वाचवला, अन्यथा मॅचचा निकाल वेगळाच लागला असता.
@IamSanjuSamson मेन ऑफ दा मैच....💞
— मोहित शुक्ला گاندھیائی (@shuklaa1986) July 22, 2022
सालो बाद दूरदर्शन पर भारत के दर्शन हुए... @ddsportschannel LOVE YOU...🇮🇳💕#DDSports pic.twitter.com/dMdj76hw9L
सिराजने शेवटच्या ओव्हरमध्ये 11 रन दिले. सिराजच्या पहिल्या बॉलवर अकील हुसैनला रन काढता आली नाही. दुसऱ्या बॉलवर त्याने एक रन घेतली. यानंतर तिसऱ्या बॉलला शेफर्डने लेग साईडला फोर मारली. तर चौथ्या बॉलवर त्याने 2 रन घेतल्या. सिराजचा पाचवा बॉल वाईड होता, त्यामुळे वेस्ट इंडिजला एक रन मिळाली. शेवटच्या 2 बॉलमध्ये वेस्ट इंडिजला फक्त 3 रन करता आल्या, त्यामुळे भारताने पहिली वनडे 3 रनने जिंकली. 3 वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये आता भारतीय टीम 1-0 ने आघाडीवर आहे. सीरिजची दुसरी वनडे रविवारी होणार आहे.