नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: कपिल देव (Kapil Dev) यांच्यानंतर टीम इंडियाला एका चांगल्या ऑल राऊंडरची कमतरता जाणवली. काही काळ हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) ही उणीव भरुन काढली. मात्र, फिटनेस नि फॉर्ममुळे पुन्हा एकदा टीम इंडियाला नव्याने ऑल राऊंडर खेळाडू निवडावा लागणार आहे. हार्दिकला गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लौकीकला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. टी 20 वर्ल्ड कपनंतर तो संघातून गायब झाला. आता तर त्याची जागा धोक्यात आली आहे. त्याच्या जागी निवड समितीने नवीन ऑल राऊंडरचा शोध सुरु केला आहे. दरम्यान, नेहमी परखड मत व्यक्त करणारा टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) ऑल राऊंडरच्या शोध मोहिमेवर आपले मत व्यक्त केले आहे. हार्दिक व्यतिरिक्त, विजय शंकर आणि आता व्यंकटेश अय्यर यांची फास्ट बॉलर्स म्हणून निवड करण्यात आली. पण अपेक्षेप्रमाणे निकाल मिळाला नाही. आता भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. टीम इंडियाने आता वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंचा शोध घेणे थांबवावे. जर तुमच्याकडे काही नसेल तर त्यासाठी जाऊ नका. हे मान्य करून पुढे जावे. जे बनवता येत नाही ते बनवण्याचा प्रयत्न करू नका. हे सर्व संकटाचे मूळ आहे." असे स्पष्ट मत त्याने यावेळी व्यक्त केले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गौतम गंभीर बोलत होता. यावेळी त्याने थेट देशांतर्गत आणि भारत-अ स्तरावर तरुणांना तयार करण्याचे मार्ग शोधण्याची वेळ आली आहे. आणि ते बीसीसीआयने स्विकारण्याची गरज पाहिजे. असे विधान केले. आम्ही सतत बोलतो की आमच्याकडे कपिल देव नंतर एकही अष्टपैलू खेळाडू नाही, खरे सांगायचे तर, आपण पुढे जाऊन रणजी ट्रॉफीतूनच खेळाडू तयार केले पाहिजेत आणि जेव्हा तुम्हाला वाटत असेल की ते तयार आहेत, तेव्हा त्यांनी थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर जावे. माझा नेहमीच विश्वास आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे शिकवण्याचे व्यासपीठ नाही, ते कामगिरीचे व्यासपीठ आहे. तुम्ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये किंवा भारत-अ स्तरावर कोणत्याही खेळाडूला तयार करू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी खेळता तेव्हा तुम्ही ताबडतोब कामगिरी करण्यास तयार असले पाहिजे. असे मत त्याने यावेळी व्यक केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.