जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs WI, 1st Test, Day 3 : …म्हणून अश्विनला संघात जागा नाही, हरभजन सिंगनं सांगितलं खरं कारण

IND vs WI, 1st Test, Day 3 : …म्हणून अश्विनला संघात जागा नाही, हरभजन सिंगनं सांगितलं खरं कारण

IND vs WI, 1st Test, Day 3 : …म्हणून अश्विनला संघात जागा नाही, हरभजन सिंगनं सांगितलं खरं कारण

पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनच्या जागी रविंद्र जडेजाला संघात स्थान देण्यात आले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    अँटिगुआ, 24 ऑगस्ट : भारतीय संघाचा माजी फिरकीपटून हरभजन सिंगनं रविचंद्रन अश्विनला कसोटी संघात सामिल करण्यात का आले नाही, याचे कारण सांगितले. भारत-वेस्ट इंडिज यांच्यात सध्या होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनच्या जागी रविंद्र जडेजाला संघात स्थान देण्यात आले, यावर काहींनी आश्चर्य व्यक्त केले तर, काहींनी आनंद. मात्र हरभजन सिंगनं अश्विनला का संघात घेतले नाही याचे खरे कारण सांगितले. हरभजन सिंगनं एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, “अश्विन संघासाठी महत्त्वाचा असा फिरकीपटू राहिलेला नाही. त्यामुळं त्याचा जागी रविंद्र जडेजाला स्थान देण्यात आले आहे”, असे सांगितले. भारत-वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामने होणार आहेत. हरभजन सिंगनं टेलिग्राफला दिलेल्या माहितीत, “बऱ्याच वेळा असे प्रसंग आले आहेत, जेव्हा अश्विननं विदेशी मैदानावर खराब गोलंदाजी केली आहे. 2018मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात मोइन अलीनं 9 विकेट घेतल्या होत्या. त्याच मैदानावर अश्विनला मात्र तीन विकेट घेता आल्या. दोघंही एकाच प्रकारची गोलंदाजी करतात, मात्र दोघांच्या खेळात अंतर आहे”, असे सांगितले. तसेच, भज्जीनं, “2018-19 ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर नजर टाकल्यास लक्षात येईल की, तेव्हा पहिल्या कसोटी सामन्यात अश्विन दुखापतींमुळे खेळू शकला नव्हता. मात्र तरी त्याला संघात स्थान देण्यात आले, मात्र त्याच्या दुखापतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळं अकरा खेळाडू निवडताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो”, असे मत व्यक्त केले. वाचा- बुमराहचा एक सल्ला आणि इशांत शर्मानं मोडली विडिंजच्या फलंदाजांची कंबर! गावस्कर यांनी प्लेइंग इलेव्हनवर व्यक्त केली होती नाराजी दरम्यान पहिल्या सामन्यासाठी अकरा खेळाडूंची निवड करण्यात आल्यावर माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली होती. गावस्कर यांनी अश्विनला संघात जागा न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. कारण वेस्ट इंडि विरोधात त्याचा रेकॉर्ड खुप चांगला आहे. अश्विननं वेस्ट इंडिज विरोधात 11 कसोटी सामन्यात 21.85च्या सरासरीनं 60 विकेट घेतल्या आहे. 2016मध्ये वेस्ट इंडिज विरोधात अश्विननं 17 विकेट घेतल्या होत्या. तसेच, 350 धावाही केल्या होत्या. वाचा- निवृत्तीच्या निर्णयावर अंबाती रायडूचा यू-टर्न, ‘या’ दोन स्पर्धा खेळतच राहणार! अश्विनला न घेण्याचे रहाणेनं सांगितले होते कारण पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर उप-कर्णधार अजिंक्य रहाणेनं, “सामन्याची परिस्थिती पाहून संघाने रविचंद्रन अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये न घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय संघाच्या गरजा पाहून घेण्यात आला आहे. जेव्हा अश्विनसारख्या खेळा़डूला बाहेर बसवलं जातं तेव्हा निर्णय सोपा नसतो. मात्र संघ व्यवस्थापनाला संघाचे संतुलन साधायचं असतं. जडेजाला संघात घेण्यात आलं कारण तो योग्य पर्याय ठरू शकतो. अष्टपैलू असलेला जडेजा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. तसेच हनुमा विहारी पर्यायी गोलंदाज म्हणून कामगिरी पार पाडू शकतो. त्यामुळं प्रशिक्षक आणि कर्णधारांनी हा निर्णय घेतला आहे. वाचा- टीम इंडियातील ‘या’ 5 खेळाडूंना मिळतो अपेक्षेपेक्षा कमी पगार, काय आहे कारण? मुख्यमंत्र्यांच्या भरधाव ताफ्यात घुसली दुचाकी, अपघाताचा LIVE VIDEO

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात