नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2019मध्ये भारतीय संघात जागा न मिळाल्यामुळं अंबाती रायडूनं फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, आता रायडूनं आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर यू-टर्न घेतला आहे. रायडूनं सर्व क्रिकेटच्या फॉर्ममधून निवृत्ती घेतली होती. त्यानं आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र, अंबाती रायडून आपलं मत बदलले आहे. दरम्यान आता रायडूनं प्रथम श्रेणी क्रिकेट तसेच, आयपीएल खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रायडूनं स्पोर्ट्सस्टारला दिलेल्या माहितीनुसार, “मी चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळत राहणार आहे. तसेच, घरेलु क्रिकेटमध्येही खेळण्याचा माझा विचार आहे. माझ लक्ष्य सध्या फिटनेस आहे. चेन्नईचा संघ तुम्हाला नेहमी चांगली वागणूक देते, तुमचे आनंदानं स्वागत करते”, असे मत व्यक्त केले. भारतासाठी रायडूनं 55 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात 47.05च्या सरासरीनं 1694 धावा केल्या आहेत. यात नाबाद 124 धावांचा समावेश आहे. तसेच, 79.04च्या स्ट्राईक रेटनं तीन शतक आणि 10 अर्धशतक केले आहेत. तर, पाच टी-20 सामन्यात त्यानं 10.50च्या सरासरीनं 42 धावा केल्या आहेत. वाचा- टीम इंडिया अनोख्या पद्धतीने वाहणार अरुण जेटली यांना श्रद्धांजली! नैराश्यामुळं घेतली निवृत्ती अंबाती रायडूनं वयाच्या 33व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वर्ल्ड कप संघात जागा न मिळाल्याच्या नैराश्यातून हा निर्णय त्यानं घेतला. रायडूच्या जागी विजय शंकरला संघात जागा देण्यात आली. दरम्यान शंकर जखमी झाल्यानंतर मयंक अग्रवालला संघात स्थान मिळाले. यामुळं रायडूनं आपली निवृत्ती जाहीर केली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी रायडू तंदुरूस्त नसल्यामुळं त्याला संघात दिले नाही, असे सांगितले होते. वाचा- अश्विनला किंग्ज इलेव्हन पंजाब देणार डच्चू? ‘या’ खेळाडूकडे जाणार कर्णधारपद चार वर्ष मी वर्ल्ड कपसाठी खुप मेहनत घेतली तसेच वर्ल्ड कपमध्ये जागा न मिळाल्याबद्दल विचारले असता रायडूनं, “मी निवृत्तीचा निर्णय भावूक होऊन घेतला नाही. मी वर्ल्ड कपसाठी चार वर्ष अहोरात्र मेहनत घेतली. त्यामुळं संघात स्थान न मिळाल्यानं मी नाराज झालो. पण म्हणून मी निवृत्ती घेतली असे नाही”, असे सांगितले. तसेच, “तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ जेव्हा मिळत नाही तेव्हा, तुम्ही मेहनतीनं पुढे गेलं पाहिजे. माझ्या या निर्णयामुळं मला फायदा होईल”, असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर रायडूनं मी क्रिकेट खेळत राहणार असल्याचे सांगितले. वाचा- ‘या’ एका कारणामुळं सेहवागसाठी अरुण जेटली ठरले हिरो! डोंबिवलीत दहीहंडीसाठी लावलेला खांबच गोविंदावर कोसळला LIVE VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







