जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Auction 2020 : वडील 94 हजार कोटींचे मालक, मुलाने IPLमध्ये न घेतल्याने सोडले क्रिकेट

IPL Auction 2020 : वडील 94 हजार कोटींचे मालक, मुलाने IPLमध्ये न घेतल्याने सोडले क्रिकेट

IPL Auction 2020 : वडील 94 हजार कोटींचे मालक, मुलाने IPLमध्ये न घेतल्याने सोडले क्रिकेट

जगातील सर्वात महागडी लीग म्हणून आयपीएलकडे पाहिले जाते. मात्र एका युवा खेळाडूनं आयपीएलमध्ये बोली लावली नाही म्हणून क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 डिसेंबर : जगातील सर्वात महागडी लीग म्हणून आयपीएलकडे पाहिले जाते. यंदाच्या लिलावातही परदेशी आणि भारतीय युवा खेळाडूंवरही कोट्यावधींची बोली लागली. मात्र या लिलावात चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी आणि युसुफ पठाण सारख्या खेळाडूंवर कोणत्याच संघानं बोली लावली नाही. यातच एका युवा खेळाडूनं आयपीएलमध्ये बोली लावली नाही म्हणून क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा खेळाडू आहे कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आर्यमन बिर्ला. सद्यस्थितीला कुमार मंगलम बिर्ला हे 94 हजार कोटींचे मालक आहेत. कुमारमंगलम हे आदित्य बिर्ला कंपनीचे मालक आहेत. याआधी आयपीएलमध्ये आर्यमन राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत होता. मात्र आता त्यानं अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून स्वत: ला दूर केले आहे. आर्यमननं दीर्घकाळ क्रिकेटशी संबंधित गोष्टींबद्दल गंभीर चिंतेने झगडत असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे. 22 वर्षीय आर्यमान गेल्या वर्षी आयपीएलमध्ये दाखल झाला होता. राजस्थान रॉयल्सने त्यांना 10 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर खरेदी केले मात्र त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र 19 डिसेंबर रोजी त्याचे नाव लिलावात दिसून आले नाही. त्यामुळे आर्यमन हताश झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आर्यमन घरगुती क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळतो. आर्यमननं आपल्या क्रिकेटची सुरुवात मध्य प्रदेशमधून रणजी ट्रॉफी खेळण्यापासून केली. कुमार मंगलम बिर्ला हे सुध्दा क्रिकेटचे खुप मोठे चाहते असल्यामुळं त्यांनी नेहमीच आर्यमनला प्रोत्साहन दिले. वाचा- VIDEO : मॅक्सवेलची कमाल! मैदानावरच्या खेळाडूंनी नाही तर थेट पंचांनी पकडला कॅच

जाहिरात

वाचा- बाप तसा बेटा! ज्युनिअर द्रविडनं 14व्या वर्षीच ठोकले द्विशतक ‘मला अडकल्यासारखे वाटते’ आर्यमाननं आपल्या निवेदनात,”माझ्या क्रिकेट कारकीर्दीत येथे पोहोचण्याचा प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, हट्टीपणा, जिद्द आणि दृढ धैर्य आहे. परंतु काही काळापासून मला या खेळाशी संबंधित तीव्र चिंता होत आहे. मला अडकल्यासारखे वाटते. आतापर्यंत मी सर्व समस्यांचा सामना केला आहे परंतु आता माझे मानसिक आरोग्य आणि आरोग्य सर्व गोष्टींपेक्षा महत्त्वाचे आहे. आणि म्हणून मी क्रिकेटमधून अनिश्चित ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा सुंदर खेळ माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आणि वेळ योग्य असेल तेव्हा परत येईल अशी मी आशा करतो”, असे म्हटलं आहे. वाचा- 6 वर्षांआधी सुशांत सिंग राजपूतसोबत सिनेमात होता हिरो, आता मुंबईकडून खेळणार IPL

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2020
  • First Published :
जाहिरात
जाहिरात