कटक, 22 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात कटक येथे निर्णायक सामान होत आहे. या सामन्यात टीम इंडियानं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. टी -20 मालिकेप्रमाणेच एकदिवसीय मालिकादेखील अत्यंत रोमांचक टप्प्यात पोहोचली आहे जिथे दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. त्यामुळं टीम इंडियाला या सामन्यातही चांगली कामगिरी करावी लागणार आहे. यासाठी संघामध्ये एका युवा खेळाडूला जागा देण्यात आली आहे. कटकमध्ये भारतीय संघाला वेस्ट इंडीविरुद्ध पराभव मिळालेला नाही. त्यामुळं टी-20 पाठोपाठ एकदिवसीय मालिकाही खिशात घालण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. या सामन्यात विराट कोहलीनं युवा जलद गोलंदाज नवदीप सैनीला संघात जागा दिली आहे. जलद गोलंदाज दीपक चाहर दुखापतग्रस्त झाल्यामुळे सैनीला संघात जागा मिळाली. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20मध्ये पदार्पण करणाऱ्या सैनीनं आज वनडेमध्येही पदार्पण केले. मात्र नवदीप सैनीचा क्रिकेटमधला प्रवास फार खडतर राहिला आहे. वाचा- विराटसेनेसाठी करो वा मरो सामना! टीम इंडियानं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय
Will Saini have a debut to remember?#INDvWI #TeamIndia @paytm pic.twitter.com/dyq4tuG6MK
— BCCI (@BCCI) December 22, 2019
आयपीएलमध्ये बंगळुरूकडून खेळणारा नवदीप सैनीनं पहिल्याच सामन्यातच शेन वॉटसन सारख्या दिग्गज खेळाडूला टक्कर दिली. 151च्या वेगानं गोलंदाजी करणाऱ्या या खेळाडूनं आयपीएलमध्येच सर्वांचे लक्ष वेधले. दरम्यान रणजीमध्ये दिल्लीकडून खेळणारा सैनी हा मुळचा हरियाणाचा आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीला सैनी 200 रुपये प्रति सामन्याच्या हिशोबानं सामना खेळायचा. 2013पर्यंत तर सैनी लेदर बॉलने नाही तर चक्क टेनिस बॉलनं सराव करायचा. त्यामुळं त्याचा हा प्रवास पाहता, भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी सैनीला खडतर प्रयत्न करावे लागले. वाचा- विराटच्या फ्लॉप खेळीचा रोहितनं घेतला फायदा, तीन वर्षांनंतर मिळवलं सिंहासन! गौतम गंभीरनं केले होते गोलंदाजीचे कौतुक रणजी स्पर्धेत दिल्ली संघाकडून खेळणाऱ्या सैनीची माजी कर्णधार गौतम गंभीरनं तारिफ केली होती. 2013-14मध्ये रणजी संघासाठी निवड झाली होती. दरम्यान 2017-18 दिल्लीला अंतिम फेरीत पोहचवण्यासाठी सैनीनं महत्त्वाची भूमिका होती. 8 सामन्यात त्यानं 34 विकेट घेतल्या होत्या. वाचा- वडील 94 हजार कोटींचे मालक, मुलाने IPLमध्ये न घेतल्याने सोडले क्रिकेट **भारतीय संघ-**रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, केदार जाधव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव आणि नवदीप सैनी.

)







