मुंबई, 9 जानेवारी : भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या वनडे सीरिजला 10 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. टी-20 सीरिजमध्ये विजय मिळवल्यानंतर याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 2023 ची सुरूवात चांगली करण्याच्या प्रयत्नात असेल. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेच्या एक दिवस आधीच रोहित शर्माने पत्ते उघडले आहेत. पहिल्या वनडेमध्ये इशान किशन खेळणार नसल्याचं रोहितने स्पष्ट केलं. रोहितच्या या विधानानंतर सोशल मीडियावर उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. 2022 च्या शेवटी इशान किशनने बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या इनिंगचं अनेकांनी कौतुक केलं. बांगलादेशविरुद्धच्या वनडेमध्ये इशान किशनने फक्त 131 बॉलमध्ये 210 रनची वादळी खेळी केली. 200 रन पूर्ण करण्यासाठी इशान किशनने 126 बॉलचा सामना केला. या इनिंगमध्ये इशान किशनने अनेक रेकॉर्ड मोडले, पण या खेळीनंतरही इशान किशनला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये संधी मिळणार नाही. वनडे सीरिजआधी कर्णधार रोहित शर्माने टीममध्ये बदलांबाबत चर्चा केली. तसंच जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे खेळू शकणार नाही, असंही रोहितने सांगितलं. आम्हाला शुभमन गिलला जास्त संधी द्यायची आहे, त्यामुळे दुर्दैवाने इशान किशन खेळणार नाही, असं रोहित शर्मा म्हणाला. तसंच एनसीएमध्ये नेट्समध्ये बॉलिंगचा सराव करताना बुमराहला दुखापत झाल्याची माहिती रोहितने दिली. बांगलादेशविरुद्ध रोहितला दुखापत रोहित शर्माला बांगलादेश दौऱ्यात दुसऱ्या वनडेवेळी अंगठ्याला दुखापत झाली होती, यानंतर इशान किशनला ओपनिंगची संधी मिळाली. मिळालेल्या या संधीचं इशान किशनने सोनं केलं. डबल सेंच्युरी मारून इशानने रोहित शर्माचा विक्रम मोडला. रोहितने वयाच्या 26 व्या वर्षी द्विशतक केलं होतं, तर इशान किशनने हाच विक्रम वयाच्या 24व्या वर्षी केला. श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजसाठी भारतीय टीम रोहित शर्मा, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अक्सर पटेल, इशान किशन, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.