CAAवर पहिल्यांदाच बोलला कॅप्टन कोहली, सामन्याआधी केले मोठे वक्तव्य
CAAवर पहिल्यांदाच बोलला कॅप्टन कोहली, सामन्याआधी केले मोठे वक्तव्य
गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर भारत-श्रीलंका सामना खेळला जाणार आहे. मात्र नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) विरोधात सध्या गुवाहटीमध्ये निदर्शने सुरू आहेत.
गुवाहटी, 04 जानेवारी : भारतीय संघाचा कर्णधार (Indian Cricket Team) विराट कोहलीनं 5 जानेवारीला गुवाहटी येथे होणाऱ्या श्रीलंकाविरुद्ध टी-20 सामन्याआधी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विराटनं पहिल्यांदाच नागरिकत्व सुधारणा कायदावर (Citizenship Amendment Act) भाष्य केले. विराटनं यावेळी, “याबाबत मी संपूर्ण माहितीशिवाय या विषयावर बोलणार नाही. मात्र ऐवढेच सांगेन की हे शहर सुरक्षित आहे”, असे सांगितले. गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर हा खेळला जाणार आहे. मात्र नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) विरोधात सध्या गुवाहटीमध्ये निदर्शने सुरू आहेत.
या कायद्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील दडपलेल्या अल्पसंख्यांकांना भारताचे नागरिकत्व मिळवणे सोपे होईल. मुख्य म्हणजे या कायद्यासंदर्भात देशभरात बरीच निषेध नोंदविला जात आहे. गेल्या महिन्यात या कायद्याच्या निषेधार्त अनेक ठिकाणी हिंसाचारही झाले. एकीकडे अभिनेते आणि अभिनेत्री या कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधात मत व्यक्त करत असले तरी विराट कोहलीनं याबाबत कोणतीही भुमिका घेतलेली नाही.
'पूर्ण माहितीशिवाय कोणतेही विधान नाही'
सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत, 'दोन्ही बाजूंनी (पाठिंबा व विरोधक) ठाम मते असलेल्या या विषयावर मला बेजबाबदारपणे मत व्यक्त करायचे नाही. माझ्याकडे संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, त्याचा अर्थ काय आहे आणि काय चालले आहे, तेव्हाच मी माझे मत व्यक्त करू शकतो’, असे सांगितले.
Won't comment on CAA without having proper knowledge on it: Virat Kohli
'या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती नाही'
जेव्हा पत्रकारांनी विराटला CAAबाबत विचारले असता, 'मला अशा प्रकरणावर बोलायचे नाही बद्दल मला योग्यरित्या माहित नाही आणि अशा परिस्थितीत माझी काही जबाबदारी आहे. त्यामुळं याबाबत माहिती घेऊन सविस्तर बोलेन’, असे सांगितले. तसेच, गुवाहाटीमधील सुरक्षेबाबत कोहली समाधानी आहे.
श्रीलंकेविरुद्ध मालिका
05 जानेवारी: पहिला टी-20 (गुवाहाटी)
07 जानेवारी: दुसरा टी-20 (इंदूर)
09 जानेवारी: तिसरा टी-20 (पुणे)
भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.