विशाखापट्टणम, 05 ऑक्टोबर : पहिल्याच सामन्यात सलामीवीर म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांमध्ये शतकी खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहे. याचबरोबर रोहितनं दाखवून दिले की तो फक्त टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाही तर कसोटीमध्येही आपली कमाल दाखवून दिली. रोहित शर्मानं दोन्ही डावांमध्ये चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात 176 तर दुसऱ्या डावात 127 धावा केल्या. आपल्या शतकी कामगिरीसह रोहितनं अनेक विक्रम आपल्या नावावर केले. रोहितच्या दोन शतकांच्या जोरावर त्यानं सलामीचा फलंदाज म्हणून सर्वात जास्त धावा केल्या आहेत. याशिवाय रोहित शर्माच्या नावावर एक लाजीरवाण्या विक्रमाचीही नोंद झाली आहे. हा विक्रम आतापर्यंत कोणाच्याही नावावर नव्हता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यावर भारताची जबरदस्त पकड आहे. या सामन्यात रोहितनं शानदार कामगिरी केली. सलग दुसऱ्या डावात रोहितनं आपले शतक पूर्ण केले. केवळ 133 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह रोहितनं आपले दुसरे शतक पूर्ण केले. त्यानंतर 127 धावांवर रोहित शर्मा बाद झाला. रोहित आणि पुजारा यांच्या शतकी भागिदारीच्या जोरावर भारतानं 323 धावांवर डाव घोषित करत आफ्रिकेसमोर 395 धावांचे बलाढ्य आव्हान ठेवले आहे. दरम्यान चौथ्या दिवसा अंती दक्षिण आफ्रिकेनं एक विकेट गमावली. त्यामुळं भारताला सामना जिंकण्यासाठी 9 विकेटची गरज आहे तर दक्षिण आफ्रिकेला या 384 धावांची गरज आहे. वाचा- रोहित शर्मानं भरमैदानात पुजाराला घातली शिवी, चाहत्यांनी विराटवर काढला राग रोहितनं केला कसोटी क्रिकेटमध्ये लाजीरवाणा विक्रम रोहितनं सलामीचा फलंदाज म्हणून कसोटीमध्ये दोन्ही डावांमध्ये शतकी कामगिरी केली. याचबरोबर रोहितच्या नावावर एका लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. हा रेकॉर्डआधी कोणाच्याच नावावर नव्हता. मात्र रोहित आता असा खेळाडू झाला आहे जो दोन्ही डावांमध्ये स्टम्प आऊट झाला आहे. रोहितच्या आधी कोणताही भारतीय फलंदाज कसोटीमध्ये दोन्ही डावांच स्टम्प आऊट झालेला नाही. केशव महाराजनं दोन्ही डावांत रोहितची घेतली विकेट रोहित शर्मानं पहिल्या डावात 244 चेंडूत 176 धावा केल्या. या डावात रोहितनं 23 चौकार आणि 6 षटकार लगावले. पहिल्या डावात दुहेरी शतक करण्याच्या लयीत असलेल्या रोहितला केशव महाराजनं स्टम्प आऊट केले. दरम्यान दुसऱ्या कसोटीतही असाच प्रकार घडला. 127 धावांवर खेळत असताना केशव महाराजच्या चेंडूवर रोहित क्रिझच्या बाहेर आला. दरम्यान डी कॉकनं लगेचच रोहितला स्टम्प आऊट केले. दोन्ही डावांमध्ये रोहितनं एकाच प्रकारे बाद होत आपल्या नावावर एका लाजीरवाण्या विक्रमाची नोंद केली आहे. वाचा- हिटमॅनची कसोटीमध्येही दहशत! झळकावलं दुसरं शतक रोहित शर्मा ठरला षटकारांचा बादशाह रोहित शर्मा एका कसोटी सामन्यात 9 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठोकला आहे. रोहितने पहिल्या डावात शतकी खेळी करताना 6 षटकार ठोकले होते. दुसऱ्या डावात 4 षटकार खेचले आहेत. यासह रोहितने सिद्धू यांच्या नावावर असलेला विक्रम मोडला. सिद्धू यांनी 1994मध्ये लखनौ कसोटीत श्रीलंकेविरुद्ध 8 षटकार ठोकले होते. याचसोबत कसोटी, टी-20 आणि वन-डे अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावे जमा झाला आहे. वाचा- रोहित शर्मानं रचला विक्रमांचा डोंगर, दिग्गजांना टाकले मागे VIDEO: निवडणुकीच्या रणधुमाळीत नवरात्राची धूम, गरब्यामध्ये मोदीच मोदी!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







