जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO : रोहित शर्मानं भरमैदानात पुजाराला घातली शिवी, चाहत्यांनी विराटवर काढला राग

VIDEO : रोहित शर्मानं भरमैदानात पुजाराला घातली शिवी, चाहत्यांनी विराटवर काढला राग

VIDEO : रोहित शर्मानं भरमैदानात पुजाराला घातली शिवी, चाहत्यांनी विराटवर काढला राग

रोहितनं पुजाराला घातलेल्या या शिवीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

विशाखापट्टणम, 05 ऑक्टोबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या कसोटी सामन्यात रोहितनं शानदार कामगिरी केली. सलग दुसऱ्या डावात रोहितनं आपले शतक पूर्ण केले. केवळ 133 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह रोहितनं आपले दुसरे शतक पूर्ण केले. त्यानंतर 127 धावांवर रोहित शर्मा बाद झाला. मात्र रोहित आणि पुजाराच्या शतकी भागिदारीमुळं भारताची मोठ्या आघाडीच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. दरम्यान पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डाव्य़ातील 7 बाद 502 धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघानं 431 धावा केल्या. भारतानं 71 धावांच्या आघाडीसह डावाची सुरुवात केली. मात्र दुसऱ्या डावात सलामीवीर रोहित आणि मयंक यांना चांगली सुरुवात करता आली नाही. मयंक केवळ 7 धावा करत माघारी परतला. त्यानंतर रोहितनं अर्धशतकी खेळी केली. यासह रोहितनं क्रिकेटमध्ये कोणालाही न जमलेली कामगिरी केली आहे. रोहितनं या सामन्यात दी वॉल असलेल्या द्रविडचा विक्रम मोडला. रोहित आणि चेतेश्वर पुजारा यांनी शतकी भागिदारी केल्यानंतर पुजारा 81 धावांवर बाद झाला. मात्र दोघं फलंदाजी करत असताना असा प्रसंग घडला की चक्क रोहितनं पुजाराला शिवी घातली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान रोहितच्या शिवीवरून इंग्लंडचा अष्टपैलु फलंदाजानं, यावेळी विराट नाही तर रोहित होता, असे म्हणतं त्याची फिरकी घेतली. दरम्यान हा व्हिडीओ पाहून चाहते मात्र रोहितवर चांगलेच भडकले आहे.

जाहिरात

मात्र चाहत्यांनी आपला राग विराटवर काढला. यात एक चाहत्यानं विराटला कर्णधारपदावरून काढा, खेळाडूंवर वाईट परिणाम होत आहे, असे लिहिले आहे. तर, काही चाहत्यांनी हा आवाज रोहितचा नसल्याचे मत व्यक्त केले आहे. याचबरोबर विराट आणि रोहित यांचे मिम्स व्हायरल होत आहेत.

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

रोहित शर्मा ठरला षटकारांचा बादशाह रोहित शर्मा एका कसोटी सामन्यात 9 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठोकला आहे. रोहितने पहिल्या डावात शतकी खेळी करताना 6 षटकार ठोकले होते. दुसऱ्या डावात 4 षटकार खेचले आहेत. यासह रोहितने सिद्धू यांच्या नावावर असलेला विक्रम मोडला. सिद्धू यांनी 1994मध्ये लखनौ कसोटीत श्रीलंकेविरुद्ध 8 षटकार ठोकले होते. याचसोबत कसोटी, टी-20 आणि वन-डे अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावे जमा झाला आहे. रोहित शर्मानं अनोखं द्विशतक रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरोद्धात मैदानात उतरला तेव्हा त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 200वा डाव खेळण्यास सुरूवात केली. भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून 200डाव खेळणारा रोहित शर्मा आठवा फलंदाज ठरला. याआधी विरेंद्र सेहवाग 388 डावांसह अव्वल स्थानी आहे. त्या पाठोपाठ सचिन तेंडुलकर (342), सुनील गावसकर (286), शिखर धवन (243), सौरव गांगुली (237), गौतम गंभीर (228), क्रिश्नमचारी श्रीकांत (217) यांनी 200 डाव खेळण्याचा विक्रम केला आहे. द वॉलला टाकले मागे एकाच कसोटी सामन्यात शतक आणि अर्धशतकी कामगिरी करणारा रोहित 17वा फलंदाज आहे. रोहितनं मायदेशात आतापर्यंत 7 अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे. यासह रोहितनं राहुल द्रविडला मागे टाकले आहे. राहुल द्रविडनं 6वेळा अर्धशतकी कामगिरी केली आहे. VIDEO: निवडणुकीच्या रणधुमाळीत नवरात्राची धूम, गरब्यामध्ये मोदीच मोदी!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात