मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : 6 महिन्यांनंतर हार्दिकचा कमबॅक! पांड्यासाठी ‘या’ 2 खेळाडूचं करिअर संपवणार विराट

IND vs SA : 6 महिन्यांनंतर हार्दिकचा कमबॅक! पांड्यासाठी ‘या’ 2 खेळाडूचं करिअर संपवणार विराट

न्यूझीलंड दौऱ्यात मानहानीकारक पराभव सहन केल्यानंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

न्यूझीलंड दौऱ्यात मानहानीकारक पराभव सहन केल्यानंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

न्यूझीलंड दौऱ्यात मानहानीकारक पराभव सहन केल्यानंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

  • Published by:  Priyanka Gawde

मुंबई, 09 मार्च : न्यूझीलंड दौऱ्यात मानहानीकारक पराभव सहन केल्यानंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी रविवारी (09 मार्च) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यात तब्बल सहा महिन्यांनंतर भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पुनरागमन करणार आहे. दुखापतीमुळे गेले कित्येक महिने पांड्या खेळापासून दूर होता. मात्र आता त्याला पुन्हा संघात जागा मिळाली आहे. फक्त हार्दिकच नाही तर शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांना सुद्धा संघात जागा मिळाली आहे. तर, दुखापतीमुळे रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 मार्चपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र या मालिकेसाठी हार्दिक पांड्याला संघात जागा मिळाली असताना शिवम दुबे आणि केदार जाधव यांना संघातून डच्चू देण्यात आला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शिवम दुबेनं गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. तर केदार जाधवला न्यूझीलंडविरुद्ध संघात जागा मिळाली होती, मात्र त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं हार्दिकला संघात जागा देण्यासाठी विराटनं या दोन खेळाडूंचा पत्ता कट केला आहे.

वाचा-पांड्या इज बॅक! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियातून 'या' खेळाडूंना वगळलं

केदार जाधव गेली 4 ते 5 वर्षे तळाला फलंदाजी करीत होता. मात्र चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजासाठी केदारला संघातून डच्चू देण्यात आला. जाधवच्या जाण्याने भारताकडे सहाव्या गोलंदाजाचा पर्यायही संपुष्टात आला. केदारच्या गोलंदाजीच्या क्षमतेमुळेच तो विश्वचषकानंतरही भारतीय संघाचा सदस्य होता. पण आता असे दिसते की त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळ जवळ संपत आली आहे.

वाचा-IPL वेळेतच होणार पण चाहत्यांना बसणार मोठा धक्का? गांगुली घेणार महत्वाची बैठक

कोहलीला नाही धोनीसारखा विश्वास

महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना केदार जाधवनं पदार्पण केले होते. मात्र धोनीनं दाखवलेला आत्मविश्वास कोहलीमध्ये दिसत नाही आहे. धोनीने जाधवचा अनेकवेळा संघात ट्रम्पकार्ड म्हणून वापर केला. कोहलीला हार्दिक पांड्याला संघात ठेवायचे आहे त्यामुळं जाधवसारख्या खेळाडूला ही किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळं संघात असूनही त्याला संघात जागा मिळाली नाही.

वाचा-तिघींपेक्षा शेफालीची कामगिरी सरस, टीम इंडियाच्या पराभवासाठी 'हे' ठरलं मोठं कारण

केदार जाधवचे एकदिवसीय करिअर

34 वर्षीय केदार जाधवनं भारतासाठी जास्त सामने खेळले नसले तरी पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत भारतीय संघात असे का याबाबत शंका आहे. 2023मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप दरम्यान केदार जाधव 37 वर्षांचा असेल त्यामुळं त्याला संघात जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. केदारनं आतापर्यंत 71 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात 42.31च्या सरासरीनं 102.18च्या स्ट्राईक रेटनं 1354 धावा केल्या आहेत. यात 2 शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने 27 विकेटही घेतल्या आहेत.

वाचा-VIDEO : ..अन् क्रिकेटरनं जगज्जेतेपदाचं सुवर्णपदक घातलं दिव्यांग चाहतीच्या गळ्यात

भारताचा एकदिवसीय क्रिकेट संघ - विराट कोहली, शिखर धवन, पृथ्वी शॉ, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव आणि शुभमन गिल.

First published:

Tags: Cricket, India vs south africa