मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ : भारत-न्यूझीलंड वनडे सीरिजवर जगाची नजर, शेवटच्या मॅचनंतर होणार मोठी घोषणा!

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड वनडे सीरिजवर जगाची नजर, शेवटच्या मॅचनंतर होणार मोठी घोषणा!

टीम इंडियाने नव्या वर्षाची सुरूवात श्रीलंकेविरुद्ध धमाकेदार कामगिरीने केली, यानंतर आता भारताचं लक्ष्य किवी टीमला चिरडण्यावर आहे. ही सीरिज जिंकली तर टीम इंडिया इतिहास घडवेल.

टीम इंडियाने नव्या वर्षाची सुरूवात श्रीलंकेविरुद्ध धमाकेदार कामगिरीने केली, यानंतर आता भारताचं लक्ष्य किवी टीमला चिरडण्यावर आहे. ही सीरिज जिंकली तर टीम इंडिया इतिहास घडवेल.

टीम इंडियाने नव्या वर्षाची सुरूवात श्रीलंकेविरुद्ध धमाकेदार कामगिरीने केली, यानंतर आता भारताचं लक्ष्य किवी टीमला चिरडण्यावर आहे. ही सीरिज जिंकली तर टीम इंडिया इतिहास घडवेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 16 जानेवारी : टीम इंडियाने नव्या वर्षाची सुरूवात श्रीलंकेविरुद्ध धमाकेदार कामगिरीने केली. भारताने पहिले टी-20 आणि मग वनडे सीरिजमध्ये विजय मिळवला. आता टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध आहे. दोन्ही टीममध्ये पहिले वनडे आणि मग टी-20 सीरिज होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजकडे जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे, कारण या सीरिजमध्ये टीम इंडियाकडे इतिहास घडवण्याची संधी आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन वनडे मॅचच्या सीरिजला 18 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. श्रीलंकेला क्लीन स्वीप केल्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धही याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी मैदानात उतरेल.

आयसीसीची नजर वनडे सीरिजवर

भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या वनडे सीरिजवर जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांसोबतच आयसीसीचीही नजर आहे. श्रीलंकेला 3-0 ने हरवल्यानंतर भारतीय टीमकडे नंबर वन होण्याची संधी आहे. सध्याच्या आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये न्यूझीलंड 117 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय टीम 110 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. ही सीरिज 3-0 ने जिंकली तर भारताच्या खात्यात 114 पॉईंट्स तर न्यूझीलंडकडे 111 पॉईंट्स होतील, त्यामुळे न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर फेकली जाईल. आयसीसी प्रत्येक सीरिज संपल्यानंतर नवी क्रमवारी जाहीर करते.

रोहितची नजर धमाक्यावर

भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपआधी विराट कोहली फॉर्ममध्ये परतला आहे. बांगलादेश दौऱ्यात शतक केल्यानंतर विराटने श्रीलंकेविरुद्ध तीन मॅचच्या सीरिजमध्ये 2 शतकं केली. मोहम्मद सिराजने त्याच्या बॉलिंगमुळे जसप्रीत बुमराहची कमतरता जाणवून दिली नाही. कर्णधार रोहित शर्माला टी-20 वर्ल्ड कपमध्ये ट्रॉफी जिंकता आली नाही, पण घरी होत असलेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये धमाका करण्यासाठी रोहित सज्ज आहे, त्यासाठी चांगली टीम तयार करण्याचा रोहितचा प्रयत्न आहे.

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय वनडे टीम

रोहित शर्मा, शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिली वनडे, 18 जानेवारी, दुपारी 1.30 वाजता, हैदराबाद

दुसरी वनडे, 21 जानेवारी, 1.30 वाजता रायपूर

तिसरी वनडे, 24 जानेवारी 1.30 वाजता इंदूर

First published:
top videos

    Tags: New zealand, Team india