जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Highlights : सुपर ओव्हर पुन्हा ठरली किवींसाठी किलर! एका क्लिकवर पाहा 11 चेंडूंचा थरार

Highlights : सुपर ओव्हर पुन्हा ठरली किवींसाठी किलर! एका क्लिकवर पाहा 11 चेंडूंचा थरार

Highlights : सुपर ओव्हर पुन्हा ठरली किवींसाठी किलर! एका क्लिकवर पाहा 11 चेंडूंचा थरार

भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेल्या चौथ्या सामन्यात पुन्हा एकदा सुपरओव्हरचा थरार पाहायला मिळाला. मात्र या सामन्यातही भारतानं बाजी मारली.

  • -MIN READ
  • Last Updated :

वेलिंग्टन, 31 जानेवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेल्या चौथ्या सामन्यात पुन्हा एकदा सुपरओव्हरचा थरार पाहायला मिळाला. मात्र या सामन्यातही भारतानं बाजी मारली. सुरुवातीला न्यूझीलंडला शेवटच्या ओव्हरमध्ये 7 धावांची गरज असताना शार्दुल ठाकूरने शेवटचे दोन चेंडू स्लो टाकत सामना सुपर ओव्हरपर्यंत घेऊन आला. भारतानं दिलेल्या 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला हे आव्हान पार करता आले नाही. अखेर सुपर ओव्हरमध्येही पुन्हा एकदा टीम इंडियाचा ढंका पाहायला मिळाला. विराट कोहलीनं 2 चेंडूत 2 धावांची गरज असताना चौकार मारत सामना संपवला. वाचा शेवटच्या 11 चेंडूंमध्ये नेमकं काय घडलं…

जाहिरात

न्यूझीलंडची फलंदाजी भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सुपर ओव्हरमध्ये भारताने जसप्रीत बुमराहच्या हाती चेंडू दिला. न्यूझीलंडकडून फलंदाजासाठी सेफर्ट आणि मुनरो फलंदाजीसाठी आले होते. पहिल्या चेंडूवर सेफर्टने एक धावा काढली, यावेळी श्रेयस अय्यरनं कॅच सोडला. दुसऱ्या चेंडूवर सेफर्टने चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर बुमराहच्या शॉट बॉलवर सेफर्टला बाद करण्याची संधी होती. मात्र केएल राहुलनं हा कॅच सोडला. चौथ्या चेंडूवर वॉशिग्टन सुंदरने सीमारेषेवर चांगला कॅच घेतला. पाचव्या चेंडूवर रॉस टेलरने चौकर मारला. सहाव्या चेंडूवर एकही धाव न्यूझीलंडला घेता आला नाही. त्यामुळं भारताला 14 धावांचे आव्हान आहे. भाराताची फलंदाजी न्यूझीलंडकडून टीम साऊदीने गोलंदाजी केली. तर, भारताकडून फलंदाजासाठी केएल राहुल आणि विराट कोहली मैदानात उतरले. राहुलनं पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. दुसऱ्या चेंडूवर राहुलनं चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर केएल राहुल आक्रमक शॉट खेळण्याच्या नादात बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसन फलंदाजीसाठी आला. चौथ्या चेंडूवर विराटनं विराटने 2 धावा काढल्या. पाचव्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना विराटनं चौकार मारत भारतानं हा सामना जिंकून दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket
  • First Published :
जाहिरात
जाहिरात