मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

कशी आहे भारताच्या महिला क्रिकेट संघाची ड्रेसिंग रूम? पाहा VIDEO

कशी आहे भारताच्या महिला क्रिकेट संघाची ड्रेसिंग रूम? पाहा VIDEO

भारताच्या महिला क्रिकेट संघाने टी20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.

भारताच्या महिला क्रिकेट संघाने टी20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.

भारताच्या महिला क्रिकेट संघाने टी20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.

  • Published by:  Suraj Yadav
मेलबर्न, 29 फेब्रुवारी : आयसीसी टी20 महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतानं सलग चार सामने जिंकले आहेत. लंकेविरुद्धचा सामना भारताने 7 विकेट राखून जिंकला. लंकेनं प्रथम फलंदाजी करताना 114 धावा केल्या. त्यानंतर भारतानं शफाली वर्माच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर 14.4 षटकात आव्हान पूर्ण केलं. शफालीने 34 चेंडूत 47 धावा केल्या. भारताच्या महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. इंडियाच्या महिला संघाच्या ड्रेसिंगरूमचा व्हिडिओ आयसीसीनं शेअर केला आहे. वेदा कृष्णमुर्तीने भारताच्या महिला संघाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण कसं आहे ते व्हिडिओमधून सांगितलं आहे. संघात सर्वात गोंधळ, वेंधळेपणा कोण करतं? डान्सर कोण आहे? गाणी ऐकायला कुणाला आवडतं यासह अनेक खुलासे वेदानं केले आहेत. हरमनप्रीत सर्वात गोंधळलेली असते. तिचं साहित्य विस्कटलेलं असल्याचं दाखवलं आहे. तर आपलं साहित्य नेहमी नीटनेटकं असल्याचं वेदा म्हणते. हरलीन संघातील कलाकार असल्याचं वेदा सांगते. यानंतर शिखा पांडे जुनी गाणी ऐकते आणि तिला अपडेट होण्याची गरज आहे असंही वेदा गमतीने म्हणते. दरम्यान, श्रीलंकेने दिलेल्या 114 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी 34 धावांची भागीदारी केली. मात्र या सामन्यातही स्मृतीला चांगली खेळी करता आली नाही, 17 धावांवर ती बाद झाली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आली. मात्र गेल्या तीन सामन्यात फ्लॉप खेळी केलेली हरमन या सामन्यातही 15 धावा करत बाद झाली. भारताकडून शेफालीनं 47 धावांची सर्वोत्तम खेळी केली. मात्र जेमीमा आणि शेफीला यांच्यातील विसंगतीमुळं शेफाली धावबाद झाली. त्यामुळ सलग दुसऱ्यांदा तिचे अर्धशतक हुकले. याआधी बांगलादेशविरुद्ध शेफालीनं 46 धावा केल्या होत्या. वाचा : हार्दिक पांड्याकडून खूपच मोठी चूक, पुन्हा BCCI करणार कारवाई?
First published:

Tags: Cricket

पुढील बातम्या