क्रिकेटपटूनं 19 वर्षीय तरुणीशी केलं लग्न, नातेवाईकाला समारंभातच झाली मारहाण

क्रिकेटपटूनं 19 वर्षीय तरुणीशी केलं लग्न, नातेवाईकाला समारंभातच झाली मारहाण

स्टार क्रिकेटपटूनं बुधवारी 19 वर्षीय मुलीशी लग्न केलं. या लग्नसमारंभावेळी झालेल्या गोंधळात एका नातेवाइकाला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 फेब्रुवारी : बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू सौम्या सरकारने बुधवारी लग्न केलं. 19 वर्षांच्या पूजा देवनाथ हिच्याशी सौम्या सरकारचा विवाह समारंभ पार पडला. पूजा खुलना इथली असून तिनं नुकतंच ढाकामध्ये इंग्लिश मीडियम स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. या विवाह सोहळ्याला निवडक लोक आणि क्रिकेटपटू उपस्थित होते.

सौम्या सरकारचे लग्न एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलं. यामुळे दोन्ही कुटुंबाना मनस्ताप झाला. लग्नामध्ये चोर घुसले होते. त्यांनी जवळपास सात मोबाइलची चोरी केली. यातील एक फोन सौम्या सरकारच्या वडिलांचा होता.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  सात मोबाइल फोन चोरण्यात आले होते. चोरांना रंगेहात पकडण्यात आलं आणि तिथलं वातावरण तापलं. संशयितांनी सौम्या सरकारच्या एका नातेवाईकाला मारहाण केली. यावेळी पोलिसांनी धाव घेतली. चोरांकडून मोबाइल जप्त करण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

बांगलादेशचा स्टार क्रिकेटपटू सौम्याने आतापर्यंत 15 कसोटी, 55 एकदिवसीय आणि 48 टी 20 सामने खेळले आहेत. यात त्यानं तीन आंतरराष्ट्रीय शतकांसह तीन हजार धावा केल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर 18 विकेट आहेत. सौम्या सरकारने 2014 मध्ये झिम्बॉम्बेविरुद्ध पदार्पण केलं होतं.

सध्या सुरू असलेल्या कसोटी आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये बांगलादेशला एकही गुण मिळालेला नाही. त्यांनी आतापर्यंत खेळलेले तीनही सामने गमावले आहेत. दोन्ही सामन्यात भारताकडून तर एका सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला.

वाचा : क्रिकेटपटू एवढा तापला की डोक्यातून धूर निघाला? VIDEO VIRAL

First published: February 29, 2020, 10:09 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या