ऑकलंड, 24 जानेवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात किवींनी युवा गोलंदाजांचे कंबरडे मोडले. पहिल्याच सामन्यात भारताला 204 धावांचे आव्हान दिले. मात्र या सामन्यात रोहितनं भारताला पहिले यश मिळवून दिले. रोहितनं सीमारेषेजवळ हवेत उडी मारत अविश्वसनीय कॅच घेतला. रोहितच्या या कॅचमुळेच मार्टिन गुप्टिल बाद झाला. मार्टिन गुप्टिलने शिवम दुबेच्या बाऊन्सरच्या चेंडूवर जोरदार खेचला तेव्हा प्रत्येकाला हा षटकार आहे असे वाटले. मात्र रोहित शर्माने बाऊंड्री लाइनवर अविश्वसनीय झेल घेतला आणि 30 धावांच्या वैयक्तिक धावसंख्यावर गुप्टिलला पॅव्हिलियनमध्ये पाठवले. यामुळं न्यूझीलंडची पहिली विकेट 7.5 षटकांत 80 धावांवर गेली. वाचा- टॉस दरम्यान घडला अजब प्रकार, कॅप्टन कोहलीच विसरला सर्वात महत्त्वाचं नाव
वाचा- विल्यमसन आणि टेलरकडून गोलंदाजांची धुलाई, भारताला 204 धावांचे आव्हान भारताला 204 धावांचे आव्हान भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताला न्यूझीलंडने 204 धावांचे आव्हान दिले. शेवटच्या 10 ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाजांची किवींनी चांगलीच धुलाई केली. रॉस टॉलरने 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. टेलरचे हे पहिले टी-20 अर्धशतक आहे. त्याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 203 धावांपर्यंत मजल मारली. टेलरला केन विल्यम्सनने चांगली साथ दिली. केन 25 चेंडूत 51 धावांची खेळी केली, मात्र अखेर कर्णधार विराट कोहलीनं केनचा झेल घेत त्याला माघारी धाडले. भारताकडून शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या. वाचा- IPL 2020मध्ये शुभमन गील होणार KKRचा कर्णधार? शाहरुखनं केला खुलासा