IND vs NZ : मनीष पांडेने केली मोठी चूक! पंचांमुळे वाचला भारतीय संघ, पाहा VIDEO

IND vs NZ : मनीष पांडेने केली मोठी चूक! पंचांमुळे वाचला भारतीय संघ, पाहा VIDEO

विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्ध सामना जिंकत विजयी शुभांरभ केला. त्यामुळं पाच सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0ने आघाडी घेतली आहे.

  • Share this:

ऑकलंड, 25 जानेवारी : विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्ध सामना जिंकत विजयी शुभांरभ केला. त्यामुळं पाच सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0ने आघाडी घेतली आहे. हा सामना भारतीय संघाने 6 विकेटनं जिकंला.

पहिले फलंदाजी करत न्यूझीलंडने भारताला 204 धावांचे बलाढ्य आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना केएल राहुल (56) आणि श्रेयस अय्यर (58) यांनी अर्धशतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. भारतानं हा सामना जिंकला असला तरी या सामन्यात घडलेली एक सामना संघाला महागात पडली असती. पंचांच्या नजरेत मनीष पांडेने केलेली चूक आली असतील तर किवींना अतिरिक्त पाच धावा मिळाल्या असता. त्यानंतर भारताच्या अडचणी कदाचित वाढल्या असता.

वाचा-VIDEO : पंतच्या करिअरला लागला सुरुंग! सामन्यानंतर राहुलनेच उडवली ऋषभची खिल्ली

वाचा-VIDEO : भारताला मिळाला नवा धोनी! श्रेयस अय्यरचा विजयी षटकार

बुमराहच्या गोलंदाजीवर पांडेची फेक फिल्डिंग

टीम इंडियाला हा फटका फेक फिल्डिंगमुळे बसला असता. 20व्या ओव्हरमध्ये बुमराहच्या गोलंदाजीवर रॉस टेलरनं मिडीविकेटमध्ये शॉट खेळला. टेलरनं एक धाव काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी फिल्डर मनीष पांडेच्या हातातून चेंडू निसटल्यानंतर त्याने फेक फिल्डिंग करत फलंदाजाला चकवा देण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, पंचांनी जर पकडले असते तर मनीष पांडेमुळं संघाला 5 धावांची पेनल्टी लागली असती. ICCच्या नियम 41.5नुसार भारताला ही पेनल्टी बसली असती. याआधी फेक फील्डिंगसाठी मार्नस लाबुशेनवर पेनल्टी लागली होती.

वाचा-VIDEO : हिटमॅन की सुपरमॅन? हवेत उडी मारत रोहितनं घेतला अविश्वसनीय कॅच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jan 25, 2020 09:55 AM IST

ताज्या बातम्या