वाचा-VIDEO : हिटमॅन की सुपरमॅन? हवेत उडी मारत रोहितनं घेतला अविश्वसनीय कॅच किपिंगच्या जबाबदारीमुळे खुश आहे राहुल राहुलनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत पंतच्या जागी किपिंग केली होती. त्यावेळी पंत जखमी झाला होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध राहुलनं फलंदाजीमध्येही चांगली कामगिरी केली. त्यानंतर विराट कोहलीनं 2003च्या वर्ल्ड कपमध्ये राहुल द्रविडनं जी भुमिका बजावली होती, तशीच कामगिरी राहुल करेल, असे सांगितले होते. त्यामुळं न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतही राहुलच विकेटकिपरची भुमिका पार पाडेल, असे दिसत आहे. वाचा-विराटसेनेचा विजयी शुभारंभ! टीम इंडियानं 6 विकेटनं जिंकला सामना ‘किपिंग करणे फायद्याचे’ न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20नंतर राहुलने, “खर सांगायचे तर मला किपिंग करणे आवडते. आंतरराष्ट्रीय स्थरावर हा अनुभव नवीन वाटतो, मात्र आयपीएलमध्ये ही भुमिका मी पार पाडली आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा किपिंग करण्याचा प्रयत्न मी करतो. विकेटकिपिंगचा अभ्यासही मी करतो”, असे सांगितले. तसेच, किपिंग केल्यामुळं खेळपट्टीचा अंदाजही चांगला येतो..@klrahul11 was full of praise for @ShreyasIyer15 in the post-match presser🙌#NZvIND #TeamIndia pic.twitter.com/rSTQWdiMZ6
— BCCI (@BCCI) January 24, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket