मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: पुण्यात कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? इंग्लंडसाठी धोकादायक ठरतील हे 2 खेळाडू

IND vs ENG: पुण्यात कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? इंग्लंडसाठी धोकादायक ठरतील हे 2 खेळाडू

India vs England, 1st ODI : भारताच्या दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला या आधीच्या कसोटी आणि टी-20 मालिकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आजपासून पुण्यातील एमसीएच्या क्रिकेट स्टेडियमवर तीन सामन्यांची वन-डे क्रिकेट मालिका सुरू होत आहे.

पुढे वाचा ...

पुणे, 23 मार्च: भारताच्या दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला या आधीच्या कसोटी आणि टी-20 मालिकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आजपासून (India vs England, 1st ODI) पुण्यात असलेल्या एमसीएच्या गहुंजेतील क्रिकेट स्टेडियमवर तीन सामन्यांची वन-डे क्रिकेट मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील तिन्ही सामने डे-नाइट असून ते दुपारी दीड वाजता सुरू होतील. त्यातला पहिला सामना (India vs England, 1st ODI) आज खेळवला जाणार आहे. एमसीएच्या या स्टोडियमवरील भारतीय क्रिकेट संघाची या आधीची कामगिरी कशी आहे यावर एक नजर टाकूया.

एमसीएच्या या स्टेडियमवर झालेल्या निम्म्या सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळवला आहे. भारतीय संघाने इथं झालेल्या 4 पैकी 2 सामन्यांत विजय मिळवला आहे. अर्थात केवळ 50 टक्केच विजयाची शाश्वती आहे. 2017 मध्ये झालेल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने जो रूटच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाचा तीन विकेट्सने पराभव केला होता. याठिकाणी पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 291 तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या 265 आहे.

चारपैकी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला दोन सामन्यांत तर पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दोन सामन्यांत विजय मिळाला आहे. या मैदानावर केलेली सर्वाधिक धावसंख्या 356 रन आहे आणि ती इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतानेच उभारली होती. या मैदानावर सर्वांत कमी धावा 232 आहेत त्याही भारतानेच केल्या आहेत. या मैदानावरची सर्वाधिक धावसंख्या आणि सर्वांत कमी धावसंख्या ही दोन्ही रेकॉर्ड भारताच्याच नावे असल्याने भारतीय संघ या सामन्यात काय करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

(हे वाचा-'खेळाडूला फेल होताना पाहणं लोकांना आवडतं', KL वर होणाऱ्या टीकेनंतर संतापला विराट)

विराटचा पुण्यात दबदबा

पुण्यातील एमसीएच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचं नाव आहे 'विराट कोहली'. त्याने या मैदानावर 319 धावा केल्या आहेत. विराटने पुण्यात 80 च्या सरासरीने फलंदाजी करत दोन शतकं तर एक अर्धशतक केलं आहे.

गोलंदाजीचा विचार करायचा तर भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने या एमसीएच्या स्टेडियमवर आतापर्यंत सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या आहेत. तसं तर या मैदानात 8 विकेट्स घेण्याचं रेकॉर्ड जसप्रीत बुमराहच्या नावे आहे पण तो या मालिकेत खेळत नाही आहे. या स्टेडियममधील पिच हे फलंदाजांसाठी पूरक आहे पण सामना पुढे जाईल तसं ते फिरकीपटूंसाठी मदत करेल असा अंदाज आहे. या आधीच्या मालिकांतील विजय आणि या मैदानावरील चांगलं रेकॉर्ड भारतीय संघ कायम राखतो की पाहुणा इंग्लंड संघ नवं रेकॉर्ड करतो हे आता पाहता येईल.

First published:

Tags: Cricket, Cricket news, IND Vs ENG, Maharashtra, Pune, Sports