नागपूर, 11 नोव्हेंबर : भारतानं नागपूरमध्ये झालेल्या टी-20 सामन्यात बांगलादेशला 30 धावांनी नमवलं. त्याचबरोबर भारतानं तीन सामन्यांची ही मालिका 2-1नं जिंकली. या सामन्यात हिरो ठरला तो जलद गोलंदाज दीपक चाहर. दीपकला मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला. जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव किंवा रवींद्र जडेजा यांच्यापैकी एकही स्टार खेळाडू नसताना भारतीय गोलंदाजांनी सर्वोत्तम कामगिरी केली. भारत-बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामना नागपूरमध्ये झाला. नागपूरच्या मैदानावर भारतानं प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशला 174 धावांचे आव्हान दिले. मात्र त्यानंतर गोलंदाजी करताना मैदानावर दव असल्यामुळं सुरुवातीला युवा गोलंदाजांची नाचक्की होत होती. चाहरने नागपूरमधील सामन्यात हॅट्ट्रिकसह 6 गडी बाद करून इतिहास रचला. त्याने 3.2 षटकांत 7 धावा देत 6 गडी बाद केले. बांगलादेशच्या डावाच्या शेवटच्या षटकात त्यानं हॅटट्रिक पूर्ण केली. त्याने तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक गडी बाद केला होता. त्यानंतर अखेरच्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर 2 गडी बाद करून बांगलादेशचा डाव संपुष्टात आणला. वाचा- VIDEO : अश्रूंचे झाले मोती, धोनीच्या संतापामुळे दीपक चाहर झाला डेथ ओव्हर किंग! मोडला चहलचा सर्वात मोठा रेकॉर्ड बांगलादेश विरोधात सर्वश्रेष्ठ कामगिरी करत दीपक चाहरनं फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलचा रेकॉर्ड मोडला. चहलनं इंग्लंडमध्ये 2017मध्ये झालेल्या सामन्यात 25 धावा देत 6 विकेट घेतल्या होत्या. चाहरच्या आधी चहल अशी कामगिरी करणारा एकमेव गोलंदाज होता, मात्र आता बांगलादेश विरोधात चाहरनं 7 धावा देत 6 गडी बाद केल्या. सामन्यानंतर चहलनं श्रेयस अय्यर आणि चाहर यांची मुलाखत घेतली यावेळी चहलनं, “तु किती बेशरम आहेस यार माझा रेकॉर्ड मोडलास”, असे म्हणाला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान चहलला या मालिकेत चांगली कामगिरी करता आली नाही. तिसऱ्या टी-20 सामन्यात त्यानं 4 ओव्हरमध्ये 43 धावा देत फक्त 1 विकेट घेतली. वाचा- रोहित-राहुलची झाली चांदी, तर कॅप्टन कोहलीला बसला शॉक
WATCH: Hat-trick of sixes, Hat-trick of wickets & a card trick to top it up. This is yet another Chahal TV special. 😎😎 @deepak_chahar9 @ShreyasIyer15 @yuzi_chahal - by @28anand
— BCCI (@BCCI) November 11, 2019
Full Video here 👉👉 https://t.co/2Ni3uCykZT pic.twitter.com/HsBGoK0CHf
वाचा- चाहरचा कहर, हॅट्ट्रिकसह केली विश्वविक्रमाची नोंद चाहरनं ऐतिहासिक हॅट्ट्रिक घेत रचला इतिहास भारताकडून कसोटी हरभजन सिंगने पहिल्यांदा हॅट्ट्रिक केली होती. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये चेतन शर्मा आणि टी20 दीपक चाहरने ही कमाल केली आहे. 2019 मध्ये तीन भारतीय गोलंदाजांनी हॅट्ट्रिक घेतली आहे. मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान अशी कामगिरी केली होती. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने विंडीजविरुद्धच्या कसोटीत हॅट्ट्रिक केली होती. दीपक चाहरने हॅट्ट्रिक घेताच तीनही प्रकारात भारतीय गोलंदाजांनी असा कारनामा केला.

)







