नागपूर, 11 नोव्हेंबर : भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरच्या हॅट्ट्रिकच्या बळावर भारताने बांगलादेशविरुद्ध अखेरच्या टी20 सामन्यासह मालिका जिंकली. चाहरने नागपूरमधील सामन्यात हॅट्ट्रिकसह 6 गडी बाद करून इतिहास रचला. त्याने 3.2 षटकांत 7 धावा देत 6 गडी बाद केले. बांगलादेशच्या डावाच्या शेवटच्या षटकात त्यानं हॅटट्रिक पूर्ण केली. त्याने तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक गडी बाद केला होता. त्यानंतर अखेरच्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर 2 गडी बाद करून बांगलादेशचा डाव संपुष्टात आणला. आतंरराष्ट्री टी20 सामन्यात हॅट्ट्रिक घेणारा दीपक चाहर पहिला पुरुष भारतीय गोलंदाज आहे. याआधी महिला गोलंदाज एकता बिश्तने टी20 मध्ये हॅट्ट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे. दीपक चाहरच्या गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशनं नागपूर टी20 मध्ये 30 धावांनी विजय मिळवला. यासह 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. भारताकडून कसोटी हरभजन सिंगने पहिल्यांदा हॅट्ट्रिक केली होती. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये चेतन शर्मा आणि टी20 दीपक चाहरने ही कमाल केली आहे. 2019 मध्ये तीन भारतीय गोलंदाजांनी हॅट्ट्रिक घेतली आहे. मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये झिम्बाम्बेविरुद्ध अशी कामगिरी केली होती. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने विंडीजविरुद्धच्या कसोटीत हॅट्ट्रिक केली होती. दीपक चाहरने हॅट्ट्रिक घेताच तीनही प्रकारात भारतीय गोलंदाजांनी असा कारनामा केला. बांगलादेशविरुद्ध टी20 मालिकेत दीपक चाहरने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने 3 सामन्यात एकूण 8 गडी बाद केले. मालिकेत चाहरने 10. षटके टाकताना 56 धावा दिल्या. या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर तीन गोलंदाज आहेत. त्यांनी प्रत्येकी 4 विकेट घेतल्या आहेत. चाहरच्या आधी टी20 मध्ये सर्वात चांगली गोलंदाजी करण्याचा विक्रम लंकेच्या अजंता मेंडिसच्या नावावर होता. त्याने 2012 मध्ये झिम्बाम्बेविरुद्ध 8 धावा देत 6 गडी बाद केले होते. नागपूर टी20 सामन्यात दीपक चाहरने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानं तिसऱ्या षटकात सलग दोन चेंडूवर लिंटन दास आणि सौम्या सरकारला बाद केलं. या षटकात त्यानं फक्त एक धाव दिली. 13 व्या षटाकत मोहम्मद मिथुनला बाद केलं. त्यानंतर चाहरने 18 व्या षटकात शेवटच्या चेंडूवर शफिउल इस्लामला तर 20 षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर मुस्तफिजर रहमान आणि अमीनुल इस्लाम यांना लागोपाठ बाद करत हॅट्ट्रिक मिळवली. VIDEO : सत्तास्थापनेतील संघर्ष शिगेला, संजय राऊत यांनी भाजपबाबत केलं मोठं विधान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







