नागपूर, 10 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना आज नागपूरात होत आहे. या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 174 धावा केल्या. यात श्रेयस अय्यरची 62 धावांची खेळी महत्त्वाची ठरली. तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रेयसनं 5 षटकारांच्या मदतीनं आपलं पहिलं अर्धशतक केवळ 27 चेंडूत पूर्ण केलं. मात्र श्रेयसला शेवटपर्यंत फलंदाजी करता आली नाही तो, 33 चेंडूत 62 करत बाद झाला. त्याआधी राहुलनं टी-20मधले सहावे अर्धशतक पूर्ण केले. मात्र राहुलही 35 चेंडूत 52 धावा करत बाद झाला. त्यामुळे केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे ट्विटरवर कौतुक केले जात आहे.
Q: Define KLass.
— Star Sports (@StarSportsIndia) November 10, 2019
A: Rahul's batting in the 3rd T20I! 😍
Catch his dashing innings LIVE NOW on Star Sports and Hotstar.#INDvBAN pic.twitter.com/QfPzchVRqH
तर, दुसरीकडे ऋषभ पंतला पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी टार्गेट केले आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यात पंत केवळ 6 धावा करता आल्या. सौम्य सरकारच्या 17व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर पंत क्लिन बोल्ड झाला. त्यामुळं पुन्हा एकदा पंतला ट्रोल करण्यात येत आहे. तिन्ही टी-20 सामन्यात पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. फलंदाज आणि विकेटकीपर म्हणून पंत अपयशी ठरला. त्यामुळं त्याला ट्रोल करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता पंतचे करिअर धोक्यात आले आहे की काय अशी चिंता व्यक्त केली जात आहे. पंतची या मालिकेतील खेळी पाहता त्याला टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे.
Rishabh Pant's career right now #INDvBAN pic.twitter.com/IKi6f8pFEK
— Just Another Guy (@JustNotherGuy11) November 10, 2019
#INDvBAN after rishabh pant facing 6 ball pic.twitter.com/PxzA7MKn5K
— ROHIT TIWARI (@Rohit28993) November 10, 2019
तत्पूर्वी बांगलादेशनं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेत भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. बांगलादेशच्या गोलंदाजांनी दुसऱ्या टी-20 सामन्यात 82 धावांची खेळी करणाऱ्या कर्णधार रोहित शर्माला शफिऊल इस्लाम 2 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर शफिऊलनेच शिखर धवनही 19 धावांवर बाद केले. त्यानंतर श्रेयस आणि राहुल यांनी अर्धशतकी भागीदारी केली. राहुल बाद झाल्यानंतर श्रेयसनं बांगलादेशच्या गोलंदाजांची शाळा घेण्यास सुरुवात केली. अफिफ हुसेनच्या 15व्या ओव्हरमध्ये श्रेयसनं 3 षटकार लगावले. तर, ऋषभ पंतला या सामन्यातही चांगली कामगिरी करू शकला नाही. सौम्य सरकारनं 6 धावांवर पंतला क्लिन बोल्ड केले. मनीष पांडे आणि शिवम दुबे यांनी शेवटच्या षटकांत आक्रमक फलंदाजी करत भारताला 174 धावांपर्यंत पोहचवले. बांगलादेशकडून शाफिकुल इस्लाम आणि सौम्य सरकारनं यांनी 2 तर, अमीन हुसेननं 1 विकेट घेतली.

)








