टीम इंडियाचे ‘गुलाबी’ दिवस! खेळाडूंनी त्याच्यासोबत केला सराव, पाहा VIDEO

टीम इंडियाचे ‘गुलाबी’ दिवस! खेळाडूंनी त्याच्यासोबत केला सराव, पाहा VIDEO

ऐतिहासिक सामन्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी स्पेशल दिवस!

  • Share this:

इंदूर, 13 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. यातील पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरपासून इंदूरच्या होळकर मैदानावर होणार आहे. तर, इडन गार्डन येथे होणारा दुसरा सामना डे-नाइट खेळवण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच दिवस-रात्र सामना खेळवला जाणार आहे. हा सामना लाल नाही तर गुलाबी चेंडूनं खेळवण्यात येणार आहे.

डे-नाइट कसोटी सामन्याच्या तयारीसाठी सध्या भारतीय संघ बंगळुरूमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये राहुल द्रविडच्या देखरेखीखाली सराव सुरू होता. दरम्यान बुधवारी टीम इंडियाच्या खेळाडूंनी पहिल्यांदाच गुलाबी चेंडूसोबत सराव केला. यावेळी विराट कोहलीनं लाल चेंडूसोबत खेळणे जास्त सोपे असल्याचे मान्य केले. तर, रोहितनं पहिल्यांदा गुलाबी चेंडूशी खेळत असल्याचे मान्य केले.

वाचा-विराट, रोहितसह टीम इंडियाच्या खेळाडूंनाही लागणार ‘नाइट शिफ्ट’!

चेतेश्वर पुजाराचा पिंक बॉलचा अनुभव संघासाठी फायद्याचा

भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज चेतेश्वर पुजारानं दुलीप ट्रॉफीमध्ये गुलाबी चेंडूनं खेळण्याचा अनुभव असल्याचे सांगितले. यावेळी पुजारानं, “मी 2016-17मध्ये पहिल्यांदा गुलाबी चेंडूनं खेळलो होतो. त्यानंतर खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र त्याचा नक्की फायदा होईल”, असे सांगितले.

वाचा-ऐतिहासिक कसोटी सामन्याआधी भारताला मिळाला 'महागुरू', रहाणेनं सांगितला मास्टरप्लॅन

असा असेल डे-नाईट सामना

नोव्हेंबरमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या गुलाबी पर्वाची सुरुवात इडन गार्डन्स मैदानावरून होणार आहे. आगामी भारतीय दौऱ्यावर बांगलादेशचा संघ (Bangladesh Cricket Team) इडन गार्डन्स (Eden Gardens)मैदानावर डे/नाईट कसोटी सामना खेळणार आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(BCCI)ने दिलेल्या प्रस्तावाला बांगलादेश क्रिकेट बोर्डा(Bangldesh Cricket Board)ने हिरवा कंदील दाखवला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये डे/नाईट कसोटीला आधीच सुरुवात झाली आहे. पण भारतात हा पहिलाच अशा प्रकारचा सामना होत आहे.

वाचा-धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जनं घेतला मोठा निर्णय, या 3 स्टार खेळाडूंना दिला डच्चू

डे-नाईट सामन्याचे नियम

पारंपारिक कसोटी सामने हे लाल चेंडूवर खेळले जात असले तरी दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये वापरला जाणारा चेंडू मात्र गुलाबी रंगाचा असतो. रात्री प्रकाशझोतात चेंडू पटकन दिसावा म्हणून हा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत कुकाबुरा या कंपनीचेच गुलाबी चेंडू वापरले गेले आहेत. इतर प्रथम श्रेणी क्रिकेट प्रमाणेच डे-नाईट टेस्टमध्ये 80 षटकानंतर नवा चेंडू घेता येतो. डे- नाईट कसोटी सामन्यांमध्येसुध्दा दिवसाला सहा तास आणि 90 षटकांच्या खेळाचे नियोजन असते. यात फॉलोऑन नचा नियम डे- नाईट कसोटीसाठी मात्र वेगळा आहे. पारंपरिक कसोटी सामन्यात पहिल्या डावाअखेर 200 धावांची आघाडी असली तर फॉलोऑन देता येता. दिवस -रात्र सामन्यात हीच आघाडी 150 धावांची असली तरी फॉलोऑन देता येतो.

Published by: Priyanka Gawde
First published: November 13, 2019, 8:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading