इंदूर, 14 नोव्हेंबर : बांगलादेश आणि भारत यांच्यात आजपासून पहिल्या कसोटी सामना होत आहे. या सामन्यात बांगलादेशनं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पहिल्या षटकापासूनच भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांवर दबाव टाकला. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव यांचा भेदक मारा आणि अश्विनची फिरकी यांच्यामुळे बांगलादेशचा अर्धा संघ माघारी परतला. चहापाण्याला जाण्याआधी शमीनं बांगलादेशच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. फॉर्ममध्ये असलेल्या मुशफिकुर रहिमला 43 धावांवर माघारी धाडले. तर पुढच्या चेंडूवर मेहदी हसनलाही सन बाद केले. आतापर्यंत भारताकडून इशांत शर्मा आणि उमेश यादवनं 1, अश्विननं 2 तर शमीनं 3 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळं चहापानापर्यंत बांगलादेशची अवस्था 140-7 अशी झाली आहे. वाचा- इंदूरमध्ये भारताचाच दबदबा! कॅप्टन कोहलीला अनोख्या विक्रमाची संधी
एकीकडे बांगलादेशच्या फलंदाजांची अवस्था बिकट असताना कर्णधार आणि उप-कर्णधारानं खराब कामगिरी केली. विराट कोहली आणि उप-कर्णधार यांनी पहिल्या डावात काही सोप्या झेल सोडल्या. त्यामुळं पहिल्याच सेशनमध्ये एक दोन नाही तर विराट आणि रहाणे यांनी प्रतिस्पर्ध्यांना तीन-तीन जीवनदान दिले. दरम्यान, भारतावर याचा परिणाम झाला नसला तरी, ही बाब गंभीर आहे. वाचा- IND vs BAN: अश्विनची कमाल; बांगलादेशचा निम्मा संघ माघारी! विराट-रहाणेचा बेजबाबदारपणा या कसोटी सामन्यात झेल सोडण्याचा शुभारंभ केला तो उप-कर्णधार अजिंक्य रहाणेनं. 17व्या ओव्हरमध्ये रहाणेनं कर्णधार मोमिनुल हकला जीवनदान दिले. अश्विनच्या उत्कृष्ठ चेंडूवर कट खेळण्याचा नादात रहाणेच्या हातात चेंडू गेला, मात्र रहाणेला झेल पकडता आला नाही.
रहाणेनंतर 24व्या ओव्हरमध्ये विराटनं उमेश यादवच्या गोलंदाजीवर तिसऱ्या स्लिपमध्ये झेल सोडला.
दरम्यान लंच ब्रेकनंतर अजिंक्य रहाणेनं पुन्हा एकदा स्लिपमध्ये झेल सोडला.
वाचा- टीम इंडियाचे ‘गुलाबी’ दिवस! खेळाडूंनी त्याच्यासोबत केला सराव, पाहा VIDEO आतापर्यंत रहाणे आणि विराटनं 21वेळा झेल सोडले आहेत. विराट आणि रहाणे या दोघांची ओळख ही चांगले क्षेत्ररक्षण म्हणून आहे, त्यामुळे अशा या दोन खेळाडूंकडून झालेली चूक धक्कादायक आहे.

)







