मुंबई, 25 नोव्हेंबर : रेल्वे स्टेशनवर गाणं गात असलेला व्हिडीओ व्हायरल झाल्यानं चर्चेत आलेली रानू मंडल आता प्रसिद्धीच्या झोतात आहे. आजकाल तिचे व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गातानाचा पहिला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रानू मंडल भलत्याच फेमस झाल्या. त्यानंतर त्यांना बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी सुद्धा मिळाली. रानू मंडल यांनी प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमियाच्या सिनेमासाठी 3 गाणी सुद्धा गायली. त्यानंतर आता रानू मंडल यांची कार्बन कॉपी सापडली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात रानू मंडल यांच्यासारखी दिसणारी एक महिला गाणं गाताना दिसत आहे. विशेष म्हणजे या महिलेनं रानू मंडल यांचच गाणं गायलं आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक या महिलेला रानू मंडल यांचं गाणं गाण्याची विनंती करताना दिसत आहेत. ज्यानंतर ही महिला रानू मंडल यांचं ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं गाताना दिसत आहे. ‘या’ आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करताना एका युवकानं या महिलेची माहिती सुद्धा दिली आहे. ही महिला गुहावटीची राहणारी आहे आणि तिचा हा व्हिडीओ तनमेय देबनं शूट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यानं लिहिलं, ही रानू मंडल 2.0 आहे.
खरं तर या महिलेचं गाणं काही खास नाही. पण तिचा हा व्हिडीओ केवळ यासाठी शूट केला गेला आहे कारण ती हुबेहूब रानू मंडल यांच्यासारखी दिसते. रानू मंडल मंडल यांनी आतापर्यंत हिमेश रेशमियाचा सिनेमा ‘हॅप्पी हार्डी अँड हीर’साठी 3 गाणी गायली आहेत. ज्यातील ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं खूपच फेमस झालं होतं. राखी सावंत म्हणते, मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आधीच सावध केलं होतं… रानू मंडल नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी चाहतीवर ओरडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्या मेकओव्हरमुळे चर्चेत आल्या होत्या. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात त्यांच्या चेहऱ्यावर खूप मेकअप दिसत होता. मात्र नंतर त्यांच्या मेकअप आर्टिस्टनं हा फोटो एडिट केलेला आहे असं सांगत त्यांच्या मेकओव्हरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. ‘एज इज जस्ट अ नंबर!’ वाढत्या वयातही सर्वाधिक कमाई करतात हे बॉलिवूड स्टार =============================================================

)







