इंदूर, 14 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. यातील पहिला कसोटी सामना इंदूरमध्ये खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशनं टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पहिल्या षटकापासूनच भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांवर दबाव टाकला. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव यांचा भेदक मारा आणि अश्विनची फिरकी यांच्यामुळे बांगलादेशचा संपूर्ण संघ 150 धावांत आटपला. त्यानंतर दिवस अखेर भारताने एक बाद 86 धावा केल्या. भारत अद्याप 64 धावांनी पिछाडीवर आहे. भारताकडून शमीने 3, इशांत शर्मा, उमेश यादव आणि आर.अश्विन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. दरम्यान, बांगलादेशकडून फक्त कर्णधार मोमिनुल आणि मुस्ताफिझूर रेहमाननं मैदानावर टिकण्याचा प्रयत्न केला. केवळ 12 धावांवर बांगलादेशचे दोन्ही सलामीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर कर्णधारानं आक्रमक फलंदाजीकडे आपला मोर्चा वळवला. मोमिनुल हकनं 80 चेंडूत 37 धावा केल्या. वाचा- IND vs BAN: पहिला दिवस- बांगलादेशचे लोटांगण; टीम इंडिया मजबूत स्थितीत! मात्र, मोमिनुलला जास्त काळ मैदानावर टिकता आले नाही. अश्विननं आपल्या फिरकीच्य जाळ्यात मोमिनुलला अडकवले. 38व्या ओव्हरमध्ये अश्विननं टाकलेला पहिला चेंडू मोमिनुलनं लेफ्ट केला. त्यानंत अश्विननं हुशारीनं दुसरा चेंडू आर्म बॉल टाकला. हा चेंडू अगदी भिंगरीसारखा फिरून स्टम्पवर लागला आणि मोमिनुल बोल्ड झाला.
वाचा- इंदूरमध्ये भारताचाच दबदबा! कॅप्टन कोहलीला अनोख्या विक्रमाची संधी मोमिनुलची विकेट घेत अश्विननं भारतासाठी फिरकी गोलंदाज म्हणून 250 कसोटी विकेट घेतली. याचबरोबर अशी कामगिरी करणारा अश्विन तिसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनच्या आधी अनिल कुंबळे आणि हरभजन सिंगनं भारतात कसोटी क्रिकेटमध्ये 250 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. वाचा- इंदूरमध्ये झाली टीम इंडियाची पोलखोल, विराट-रहाणे पडले उघडे दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मयांक अग्रवाल 37 (नाबाद) आणि चेतेश्वर पुजारा 43(नाबाद) खेळत होते. भारतीय संघाने केवळ रोहित शर्माच्या रुपाने एकच गडी गमावला. रोहित केवळ 6 धावा करुन बाद झाला. त्याआधी भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशचा कर्णधार मोमिनूल हक याचा हा निर्णय अंगलट आला. उमेश यादवने इम्रूल कायेस 6 धावांवर बाद करत बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्यानंतर इशांत शर्माने शदमान इस्लामची बाद करत दुसरी विकेट घेतली. सलामीची जोडी बाद झाली तेव्हा बांगलादेशची अवस्था 2 बाद 12 अशी होती. लंचपर्यंत बांगलादेशची अवस्था 3 बाद 63 होती. दुसऱ्या सत्रात मुस्ताफिझूर रेहमान वगळता बांगालादेशच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकता आले नाही. अश्विनने मधल्या फळीतील विकेट घेत बांगलादेशला कमबॅकची संधीच दिली नाही. त्यानंतर शमी, यादव आणि शर्मा यांनी तळातील फलंदाजांना बाद केले. भारताकडून शमीने 3, इशांत शर्मा, उमेश यादव आणि आर.अश्विन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

)







