IND vs AUS : 70 मोबाईल, 7 लॅपटॉप आणि 11 जण! भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर लावला 2 कोटींचा सट्टा

IND vs AUS : 70 मोबाईल, 7 लॅपटॉप आणि 11 जण! भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर लावला 2 कोटींचा सट्टा

भारतानं 7 विकेटनं विजय मिळवत मालिका 2-1ने जिंकली. मात्र या सामन्यावर चक्क 2 कोटींचा सट्टा लागला होता.

  • Share this:

कर्नाटक, 20 जानेवारी : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात बंगळुरू येथे 19 जानेवारी (रविवारी) रोजी दिसरा आणि निर्णायक सामना झाला. या सामन्यात भारतानं 7 विकेटनं विजय मिळवत मालिका 2-1ने जिंकली. मात्र या सामन्यात चक्क 2 कोटींचा सट्टा लागला होता.

कर्नाटक क्राईम ब्रान्च हे रॅकेट उद्धवस्त करत 11 जणांना अटक केली आहे. याचबरोबर पोलिसांनी 70 मोबईल, 2 टिव्ही आणि 7 लॅपटॉप जप्त केले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर लागलेला हा सर्वात जास्त सट्टा होता. याआधी पोलिसांनी काही लोकांना अटक केली होती.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात तिसऱ्या सामन्यात विराटसेनेनं दणदणीत विजय मिळवला. याआधी मुंबईत झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं सामना जिंकला होता. त्यानंतर कमबॅक दुसरा आणि तिसरा सामना जिंकत भारतानं ही मालिका आपल्या खिशात घातली. तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मानं 119 तर विराट कोहलीनं 89 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर, श्रेयस अय्यरनं 35 चेंडूत 44 धावा करत फिनीशरची भुमिका योग्यपणे निभावली. तत्पूर्वी, प्रथम टॉस जिंकत ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यात स्मिथच्या 131 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 50 ओव्हरनंतर भारताला 287 धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 287 धावांच्या आव्हानाचा पाठलाग 47.3 ओव्हरमध्ये करत आणखी एक मालिका विजय भारताला मिळवून दिला.

भारताने जिंकली सलग 6वी मालिका

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 12 मालिका खेळल्या गेल्या आहेत. यातील 6 मालिका भारतानं तर 6 ऑस्ट्रेलियानं जिंकल्या आहेत. दोघांमध्ये शेवटची मालिका मार्च 2019मध्ये खेळवण्यात आली होती. ही मालिका ऑस्ट्रेलियानं 3-2ने जिंकली होती. दरम्यान यंदा झालेल्या मालिकेत मागच्या पराभवाचा वचपा काढत 2-1ने ही मालिका जिंकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jan 20, 2020 10:51 AM IST

ताज्या बातम्या