Home /News /sport /

IND vs AUS: भारताला हरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाची चाल, कसोटी संघात 'या' युवा खेळाडूंची सरप्राइज एंट्री

IND vs AUS: भारताला हरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाची चाल, कसोटी संघात 'या' युवा खेळाडूंची सरप्राइज एंट्री

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवाच होणार आहे. पहिला कसोटी सामना अॅडिलेडमध्ये खेळला जाईल.

    सिडनी, 12 सप्टेंबर : भारताविरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफीत (Border Gavaskar Trophy) होणाऱ्या चार कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया संघाची (Australia Test Team) घोषणा करण्यात आली आहे. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियानं अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवाच होणार आहे. पहिला कसोटी सामना अॅडिलेडमध्ये खेळला जाईल, हा सामना डे-नाइट असेल. तर दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरला मेलबर्नमध्ये होणार आहे. तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये 7 जानेवारीला आणि चौथा 15 जानेवारीला ब्रिसबेनमध्ये होईल. कसोटी मालिकेआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी युएइतून रवाना झाला आहे. या दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून होणार आहे. तिन्ही फॉरमॅटसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. वाचा-IPL 2021मध्ये होणार आतापर्यंतचा सर्वात मोठा लिलाव! 8 नाही तर खेळणार 9 संघ भारताविरुद्ध कसोटी मालिकेचे नेतृत्वा टिम पेन करणार आहे. कसोटी संघात सीन एबॉट, मिशेल नेसर, केमरुन ग्रीन आणि विल पुकोवस्की सारख्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. संघाची निवड करण्याआधी इआन चॅपल (Ian Chappell) आणि मायकल क्लार्क (Michael Clarke) यांनी विल पुकोवस्कीला संधी मिळाली असे सांगितले होते. ऑस्ट्रेलिया कसोटी संघ- टिम पेन (कर्णधार), सीन एबॉट, जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरुन ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, मिचेल नेसर, जेम्स पॅटिंसनस, विल पुकोवस्की, स्टिव स्मिथ, मिचेल स्टार्क, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर. वाचा-ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी विराटने कशी केली तयारी? अनुष्काने शेअर केले PHOTO ऑस्ट्रेलिया ए टीम: सीन एब्बट, एश्टन एगर, जो बर्न्स, जैक्सन बर्ड, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), हॅरी कॉन्वे, कॅमरुन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रेविस हेड, मोइसेस हेनरिक्स, निक मॅडिंसन, मिचेल मार्श, मिचेल नेसर, टिम पेन, जेम्स पॅटिंसन, विल पुकोवस्की, मार्क स्टिकटी, विल सदरलॅंड, मिशेल स्विपसन. भारत-विरुद्ध ऑस्ट्रेलिया दौरा पहिली ODI : 27 नोव्हेंबर सिडनी दुसरी ODI : 29 नोव्हेंबर - सिडनी तिसरी ODI : 02 डिसेंबर - कॅनबरा पहिली टी20 : 04 डिसेंबर - कॅनबरा दुसरी टी20 : 06 डिसेंबर - सिडनी तिसरी टी20 : 08 डिसेंबर - सिडनी पहिला टेस्ट मॅच : 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर - एडिलेड दुसरी टेस्ट मॅच : 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर - मेलबर्न तिसरा टेस्ट मॅच : 07 जानेवारी ते 11 जानेवारी - सिडनी चौथी टेस्ट मॅच : 15 जानेवारी ते 19 जानेवारी - ब्रिसबेन
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या