Home /News /sport /

IPL 2021मध्ये होणार आतापर्यंतचा सर्वात मोठा लिलाव! 8 नाही तर खेळणार 9 संघ; असा आहे BCCIचा प्लॅन

IPL 2021मध्ये होणार आतापर्यंतचा सर्वात मोठा लिलाव! 8 नाही तर खेळणार 9 संघ; असा आहे BCCIचा प्लॅन

पुढच्या वर्षी बदलणार रिटेन पॉलिसीचा नियम, स्टार खेळाडूंचाही होऊ शकतो लिलाव. वाचा संपूर्ण प्लॅन.

    नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : कोरोना संकटातही बीसीसीआयनं (BCCI) आयपीएलचा तेरावा हंगाम यशस्वीपणे युएइमध्ये पार पडला. मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) विजय मिळवत तब्बल पाचव्यांदा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. मात्र आता चाहत्यांना ओढ लागली आहे ती, आयपीएल 2021 ची (IPL 2021). याआधी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं एप्रिल-मेमध्ये आयपीएलचा चौदावा हंगाम होणा असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्याआधी पुढच्या वर्षी सर्वात मोठा लिलाव (IPL auction) होणार आहे. रिपोर्टनुसार, बीसीसीआयनं सर्व फ्रेंचायजींना लिलावाची तयारी करण्यास सांगितले आहे. आयपीएलचा यंदाचा लिलाव 2021मध्ये जानेवारी किंवा फ्रेबुवारी महिन्यात होऊ शकतो. इंडियन एक्सप्रेसनं बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयनं येत्या दोन महिन्यात आयपीएल लिलावाची तयारी करणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत चर्चा झाली नाही आहे. मात्र बीसीसीआयनं यासंदर्भात चर्चा सुरू केली आहे. वाचा-रोहितच्या अर्धशतकापेक्षा सूर्यकुमारचं 'ते' बलिदान ठरलं मुंबईसाठी महत्त्वाचं! दरम्यान, 2021मध्ये आणखी एक संघ आयपीएलमध्ये सामिल होऊ शकतो. अहमदाबादमधून एक संघ येण्याची शक्यता आहे. यासाठी जगातील सर्वात मोठे मोटेरामधील सरदार पटेल स्टेडियम तयार करण्यात आले आहे. दरम्यान हा संघ कोणता असेल, याचे नाव काय असेल, याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही आहे. आयपीएल 2020मध्ये 8 संघ खेळले होते. त्यामळे 2021मध्ये 9 संघ दिसू शकतात. वाचा-IPL 2020 : आयपीएल फायनलमध्ये अर्धशतक ठोकत रोहितनं इतिहास घडवला असा असेल खेळाडूंचा लिलाव मेगा लिलावामध्ये फ्रेंचायजी तीन खेळाडूंना Right To Match (RTM) कार्डद्वारे संघात ठेवू शकतात. किती खेळाडूंना रिटेन करता येणार,याबाबत माहिती नाही आहे. मात्र हा लिलाव मोठा असणार आहे. बीसीसीआय सध्या नियम तयार करत आहे. कारण रिटेन पॉलिसी रद्द केल्यास आयपीएलमधल्या सध्याच्या 8 संघातील स्टार खेळाडू त्यांना सोडावे लागतील.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या