सिडनी, 27 नोव्हेंबर : भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia 1st ODI) यांच्यात पहिला एकदिवसीय सामना सिडनी क्रिकेट मैदानावर होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून अॅरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सलामीला उतरत तुफान फलंदाजी केली. दोन्ही खेळाडूंनी आपले अर्धशतक पूर्ण केले. तर, पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाज दबावात दिसले. अखेर 27.5 ओव्हरमध्ये भारताला पहिलं यश मिळालं. डेव्हिड वॉर्नर 69 धावांवर बाद झाला.
प्रथम गोलंदाजी करताना भारताला ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांवर दबाव टाकला आला नाही. भारतीय संघ तब्बल 8 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. शिवाय या सामन्यात प्रेक्षकही उपस्थित होते. मात्र सामन्या सुरू होण्याआधी मैदानात राष्ट्रगीतादरम्यान भारतीय चाहत्यांनी भगवा झेंडा फडकवल्याचे दिसून आले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वाचा-...म्हणून सामन्याआधी शूज न घालता मैदानात उतरला भारतीय संघ, कारण वाचून कराल सलाम
Isn't this a disrespect to the nation and Nation's National Flag? It's happening during the National Anthem . #INDvAUS pic.twitter.com/1NKnQ9G7cf
— Saalim Tyagi (@saalimtyagiii) November 27, 2020
वाचा-ऑस्ट्रेलियामध्ये कॅप्टन कोहलीच किंग, पण सिडनी क्रिकेट ग्राउंडवर रेकॉर्ड खराब
शूज न घालता मैदानात उतरले खेळाडू
सामना सुरू होण्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू शूज न घालता गोलकार स्थितीत उभे राहिले. मात्र हा सरावाचा भागा नसून एक चांगल्या कारणास्तव खेळाडूंनी हा निर्णय घेतला आहे. या मालिकेत स्वदेशी लोकांच्या संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मैदानात शूज न घालता गोलकार स्थितीत उभे राहिलेले दिसले. यात केवळ ऑस्ट्रेलियाचेच नाही तर भारतीय खेळाडूंचाही समावेश होता. याआधी ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि एकदिवसीय उप-कर्णधार पॅट कमिन्सनं सांगितले की, त्यांच्या संघाला त्यांच्या देशात आणि जगात वर्णद्वेषाच्या समस्येचा सामना करण्याचा हा सर्वात चांगला मार्ग वाटत असल्याचे सांगितले.