भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील पहिल्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकत या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड (SCG) वर पहिला सामना होत आहे.
2/ 7
एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघ टी-20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहली काही नव्या चेहऱ्यांसह उतरला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कर्णधार कॅप्टन कोहलीचे रेकॉर्ड चांगले असले तरी सिडनी मैदानावर त्याला चांगली कामगिरी करता आली नाही आहे.
3/ 7
कोहलीनं 50.17च्या सरासरीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1154 धावा केल्या आहेत. विराटनं 5 शतकही झळकावली आहेत. मात्र सिडनी क्रिकेट मैदानात विराटची बॅट विशेष तळपलेली दिसत नाही.
4/ 7
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर विराट कोहलीनं 5 डावांमध्ये 9.00च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. सिडनी मैदानावर विराटची सर्वोत्तम खेळी 21 धावा आहे.
5/ 7
मात्र आयपीएलमध्ये विराटनं सुरुवात खराब झाली असली तरी त्यानंतर त्यानं चांगली कामगिरी केली. त्यामुळे हा फॉर्म विराटसाठी फायद्याचा ठरू शकतो. विराटनं आयपीएलमध्ये 15 सामन्यात 42.36च्या सरासरीनं 121.35च्या स्ट्राइक रेटनं 466 धावा केल्या. यात 3 अर्धशतकांचा समावेश होता.
6/ 7
तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटबाबत बोलायचे झाल्यास विराटनं गेल्या एक वर्षात एकही शतकी कामगिरी केली नाही आहे. 2019 नोव्हेंबरमध्ये विराटनं बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी केली होती. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध विराटला चांगली कामगिरी करता आली नाही.
7/ 7
एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराटनं अखेरचे शतक ऑगस्ट 2019मध्ये लगावले होते वेस्ट इंडिजविरुद्ध. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2019 मधील दौऱ्यात विराटनं 19.78 आणि 89 धावांची खेळी केली होती.