Home /News /sport /

IND vs SL : टॉस जिंकताच शिखर धवनला पहिल्यांदा मिळाली 'ती' संधी, VIDEO VIRAL

IND vs SL : टॉस जिंकताच शिखर धवनला पहिल्यांदा मिळाली 'ती' संधी, VIDEO VIRAL

तिसरी वन-डे सुरु होण्यापूर्वी (India vs Sri Lanka, 3rd ODI) देखील धवनच्या या स्वभावाची झलक दिसली. सामन्यपणे खेळाडू मॅचच्या दरम्यान किंवा मॅच संपल्यानंतर सेलिब्रेशन करतात. धवनची स्टाईल वेगळीच आहे.

    कोलंबो, 23 जुलै : श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाचा कॅप्टन शिखर धवनची (Shikhar Dhawan)  आनंदी खेळाडू म्हणून क्रिकेट विश्वात ओळख आहे. तिसरी वन-डे सुरु होण्यापूर्वी (India vs Sri Lanka, 3rd ODI) देखील धवनच्या या स्वभावाची झलक दिसली. सामन्यपणे खेळाडू मॅचच्या दरम्यान किंवा मॅच संपल्यानंतर सेलिब्रेशन करतात. धवननं टॉस जिंकल्यानंतरच सेलिब्रेशन केले. शिखर धवननं टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून पहिल्यांदा टॉस जिंकला. यापूर्वीच्या दोन्ही सामन्यात श्रीलंकेच्या कॅप्टननं टॉस जिंकला होता. धवननं टॉस जिंकताच त्याच्या खास स्टाईलनं  मांडीवर हात मारत (thigh five) सेलिब्रेशन केले. धवनचे हे सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाले आहे. धवननं टॉस जिंकताच बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत पहिल्यांदाच टीम इंडियानं पहिली बॅटींग करत आहे. तिसऱ्या वन-डेमध्ये टीम इंडियानं 1-2 नाही तर तब्बल 6 बदल केले.  त्यापैकी 5 जण तर वन-डेमध्ये पदार्पण करत आहेत. संजू सॅमसन (Sanju Samson),  नितीश राणा (Nitish Rana), के. गौतम (K. Gowtham),  राहुल चहर (Rahul Chahar) आणि चेतन सकारिया (Chetan Sakariya)  या पाच जणांनी या वन-डेमध्ये पदार्पण केले आहे. त्याचबरोबर  नवदीप सैनीलाही टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. टीम इंडियाच्या बॅटींगमध्ये पावसाचा अडथळा, वाचा मॅचचे अपडेट टीम इंडियानं वन-डे क्रिकेटच्या इतिहासात तब्बल 22 वर्षांनी प्लेईंग 11 मध्ये 6 बदल केले आहेत. यापूर्वी 1999 साली पेप्सी तिरंगी मालिकेत टीममध्ये सहा बदल करण्यात आले होते.  भारताने तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी यापूर्वीच घेतली आहे. त्यामुळेच तिसऱ्या सामन्यात जास्तीत जास्त जणांना खेळण्याची संधी देण्यात आली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, India Vs Sri lanka, Shikhar dhawan, Video viral

    पुढील बातम्या