• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • रैना जडेजामध्ये ब्राम्हण-रजपूत वाद; जातियवादामुळे दोन्ही क्रिकेटपटू ट्रोल

रैना जडेजामध्ये ब्राम्हण-रजपूत वाद; जातियवादामुळे दोन्ही क्रिकेटपटू ट्रोल

ट्विटर युझर्सनी त्याला लगेच ट्रोल करायला सुरुवात केली. जातीयवादाचा प्रचार करू नये असा सल्ला देण्यास सुरूवात केली.

 • Share this:
  मुंबई 23 जुलै माजी भारतीय फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) याच्या ‘मी देखील ब्राह्मण आहे’(I am Brahmin) या विधानाचा वाद अजून शमलेला नसतानाच टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) अशाच प्रकारच्या आपल्या एका ट्विटमुळे ट्रोल (Troll) झाला आहे. जडेजा सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे आणि तिथून त्यानं ‘राजपूत बॉय फॉरएव्हर. म्हणजेच राजपूत सदैव. जय हिंद !.’ असं एक ट्विट शेअर केलं. जातीयवादाचा प्रचार करणारं जडेजाचं हे ट्विट लोकांना अजिबात आवडलं नाही. त्यामुळं ट्विटर युझर्सनी त्याला लगेच ट्रोल करायला सुरुवात केली. जातीयवादाचा प्रचार करू नये असा सल्ला देण्यास सुरूवात केली. जडेजाच्या ट्विटवर एका ट्विटर युझरनं म्हटलं की, ‘सर, तुम्ही लाखो लोकांसाठी प्रेरणा आहात. आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुमचं रंगरूप आणि धर्म यानं आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही नेहमीच तुमच्यावर प्रेम केलं आहे.’ दुसर्‍या एका युझरनं म्हटलं आहे की, जातीयवादामुळे देश उध्वस्त होत आहे. जडडूकडून अशी पोस्ट अपेक्षित नव्हती. इतक्या मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही ते जातीवादाला चालना देत आहेत, हे लज्जास्पद आहे. Guru Purnima 2021: आचरेकर सरांच्या आठवणीनं सचिन भावुक, VIDEO शेअर करत म्हणाला.. आणखी एका युझरनं लिहिलं आहे की, ‘माणूस जन्मानं महान होत नाही. तुम्ही कोण आहात याचा अभिमान बाळगा, जे लेबल तुमच्यावर लादलं आहे, त्याचा गर्व करू नका.’ रवींद्र जडेजा यांनी स्वतःला राजपूत म्हणवणे चाहत्यांना मुळीच आवडलं नसल्याचं यावरून स्पष्ट होत आहे. IND vs SL: IPL मधील नेट बॉलरचे टीम इंडियाकडून पदार्पण, क्रिकेटसाठी बूक स्टॉलवर केली नोकरी रैनाच्या टिप्पणीनं सुरू झाला वाद : सुरेश रैना यानं मी ब्राह्मण आहे, असं विधान केल्यानंतर हा सगळा वाद सुरू झाला आहे. रैनाला तमिळनाडू प्रीमियर लीगच्या (Tamilnadu Premier League) पाचव्या सत्राच्या उद्घाटन सामन्यात समालोचन करण्यासाठी आमंत्रित केले गेले होते. यादरम्यान, एका प्रश्नाच्या उत्तरात रैनानं स्वत: ब्राह्मण असल्याचा उल्लेख केला होता, त्यावरून हा सगळा वाद सुरू झाला. त्याच्या या वक्तव्यानं लोक संतप्त झाले आणि त्यांनी रैनाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. अर्थात काही लोकांनी रैनाचे समर्थनही केलं आणि मीसुद्धा ब्राह्मण असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु केला. तमिळनाडू प्रीमियर लीग सामन्यादरम्यान रैनाला एका समालोचकानं विचारलं की, त्यांनी इतक्या सहजतेने दक्षिण भारतीय संस्कृती कशी आत्मसात केली आहे. त्याला उत्तर देताना रैना म्हणाला की, मला वाटते की मीदेखील ब्राह्मण आहे. मी 2004 पासून चेन्नईत खेळत आहे. मला इथली संस्कृती आवडते. माझे इथले मित्रही मला खूप आवडतात. मी अनिरुद्ध श्रीकांतबरोबर खेळलो आहे. सुब्रमण्यम बद्रीनाथ आणि एल बालाजीदेखील इथलेच आहेत. मला चेन्नईची संस्कृती आवडते. मी सीएसकेचा(CSK-Chennai Super Kings) भाग आहे, हे माझं भाग्य आहे.’ आयपीएलच्या(IPL) पहिल्या सत्रापासून म्हणजेच 2008 पासून रैना चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. रैनाचं समर्थनही : यानंतर अनेक ट्विटर युझर्सनी रैनाला ट्रोल केले. एका युझरनं लिहिलं की, सुरेश रैना, तुला स्वतःची लाज वाटली पाहिजे. बरीच वर्षे चेन्नई संघाकडून खेळत असलास तरीही चेन्नईची खरी संस्कृती तुम्हाला कळलीच नाही, असं दिसतं. दुसर्‍या एका युझरनं सांगितलं की, रैनाने असे शब्द वापरणे टाळायला हवं होतं. त्याचवेळी काही लोकांनी रैनाचं समर्थनही केलं आणि तशा स्वरूपाच्या पोस्टदेखील शेअर केल्या.
  First published: