मुंबई, 3 जून : भारतीय क्रिकेट टीम जुलै-ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिजचा (India vs West Indies) दौरा करणार आहे. या दौऱ्यात 3 वनडे आणि 5 टी-20 मॅच खेळवल्या जाणार आहेत. भारत-वेस्ट इंडिजमधल्या या सीरिजचं प्रसारण फॅनकोड (Fancode) करणार आहे. सीरिजच्या 3 वनडे आणि 3 टी-20 मॅच त्रिनिदाद आणि सेंट किट्समध्ये होणार आहेत, तर शेवटच्या 2 टी-20 अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये खेळवल्या जातील. 22 जुलै ते 7 ऑगस्टपर्यंत ही सीरिज खेळवली जाईल. फॅनकोड क्रिकेट वेस्ट इंडिजची 2024 पर्यंतची विशेष प्रसारक आहे. ही सीरिज भारताच्या प्राईम टाईममध्ये खेळवली जाईल. वनडे मॅच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता तर टी-20 मॅच रात्री 8 वाजता खेळवल्या जातील. क्रिकेट चाहते या सीरिजचं लाईव्ह प्रसारण फॅनकोड ऍप (Android, iOS, TV) आणि www.fancode.com वर पाहू शकतील. फॅनकोड भारताची द्विपक्षीय सीरिज दाखवणारा पहिला डिजीटल प्लॅटफॉर्म ठरणार आहे. या सीरिजमधून 10 कोटी क्रिकेट रसिकांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारताचा वेस्ट इंडिज दौरा पहिली वनडे, 22 जुलै, त्रिनिदाद दुसरी वनडे, 24 जुलै, त्रिनिदाद तिसरी वनडे, 27 जुलै, त्रिनिदाद पहिली टी-20, 29 जुलै, त्रिनिदाद दुसरी टी-20, 1 ऑगस्ट, सेंट किट्स तिसरी टी-20, 2 ऑगस्ट, सेंट किट्स चौथी टी-20, 6 ऑगस्ट, फ्लोरिडा पाचवी टी-20, 7 ऑगस्ट, फ्लोरिडा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.