मुंबई, 6 जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या टी 20 मालिकेत उद्या निर्णायक सामना पारपडणार आहे. भारताने श्रीलंकाविरुद्ध मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर गुरुवारी मालिकेतील दुसरा सामना जिंकून श्रीलंकेने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. आता सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या टी 20 मालिकेतील तिसऱ्या सामन्याकडे लागले असून उद्याच्या सामन्यात कोण बाजी मारणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. श्रीलंका विरुद्धचा तिसरा टी 20 सामना हा उद्या शनिवारी राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडिअमवर पारपडणार आहे. या स्टेडियमवर भारतीय संघाचा विजयाचा रेकॉर्ड असल्याने या सामन्यात भारत श्रीलंकेवर भारी पडणार असे बोलले जात आहे. भारताने आतापर्यंत या स्टेडिअमवर 4 टी20 सामने खेळले आहेत. तर यापैकी ३ सामने भारताने जिंकले असून केवळ एका सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. हे ही वाचा : संजू फिट तरीही बीसीसीआयने रेस्ट का दिली? पराभवानंतर चाहत्यांचा सवाल भारतीय संघाने राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडिअमवर गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. ज्यात भारताने 82 धावांनी विजय मिळवला होता. यापूर्वी 2019 मध्ये भारताने येथे बांगलादेशचा 8 गडी राखून पराभव केला होता. या मैदानावर श्रीलंकेचा संघ प्रथमच T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. भारतीय संघाने या मैदानावर 2013 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळला होता. त्यानंतर टीम इंडियाने कांगारूंचा 6 विकेटने पराभव केला. यानंतर 2017 मध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी झाला. यजमान संघाचा किवी संघाने 40 धावांनी पराभव केला. राजकोटमच्या या स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 2 सामने जिंकले आहेत तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघानेही तेवढ्याच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. या मैदानावर भारताने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 गडी गमावून 202 धावा केल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.