पुणे, 05 जानेवारी : दुसऱ्या टी२० सामन्यात भारताचा श्रीलंकेविरुद्ध १६ धावांनी पराभव झाला. भारताचा निम्मा संघ ५७ धावात बाद झाल्यानतंर सूर्यकुमार आणि अक्षर पटेल यांनी ९१ धावांची भागिदारी केली. पण सूर्यकुमार आणि अक्षर पटेल बाद झाल्यानतंर भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. शेवटच्या षटकात दसुन शनाकाकडे चेंडू सोपवत श्रीलंकेच्या कर्णधाराने आश्चर्याचा धक्का दिला. अखेरच्या षटकात २१ धावा हव्या असताना भारताला फक्त पाचच धावा काढता आल्या. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भक्कम सुरुवात केल्यानंतर श्रीलंकेची पडझड झाली पण दसुन शनाकाने चरिथ असालंकाला साथीला घेत डाव सावरला. त्यानंतर चमिका करुणारत्नेसोबत नाबाद अर्धशतकी भागिदारी केली. ६ बाद १३८ वरून श्रीलंकेने २० षटकात ६ बाद २०६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. श्रीलंकेने दिलेल्या २०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा निम्मा संघ ५७ धावात तंबूत परतला. इशान किशन, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर हार्दिक पांड्या १२ धावांवर बाद झाला. श्रीलंकेकडून कसुन रजिथाने दोन तर मदुशंका, करुणारत्ने आणि हसरंगा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला आहे. यानंतर सुर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी ९१ धावांची भागिदारी केली. मात्र सूर्यकुमार यादव अर्धशतक झाल्यानतंर उंच फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचे सलामीवीर पथुम निसंका आणि कुशल मेंडिस यांनी जबरदस्त अशी सुरुवात करून दिली होती. दोघांनी ८० धावांची भागिदारी केली. पण युझवेंद्र चहलने कुशल मेंडिसला बाद करून ही जोडी फोडली. मेंडिसने ३१ चेंडूत ५२ धावा केल्या. त्यानंतर पुढच्याच षटकात उमरान मलिकने भानुका राजपक्षेला २ धावांवर त्रिफळा उडवत तंबूत धाडलं. तर १२ व्या षटकात अक्षर पटेलने पथुम निसंकाला राहुल त्रिपाठीकडे झेल देण्यास भाग पाडलं. तर त्यानतंर पुन्हा अक्षर पटेलनेच धनंजय डिसिल्वाला अवघ्या तीन धावांवर बाद केलं. राहुल त्रिपाठीचे पदार्पण टीम इंडियात आज राहुल त्रिपाठीने टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. हार्दिक पांड्याने सांगितले की, “राहुल त्रिपाठी आज भारतीय संघात पदार्पण करत आहे. संजू सॅमसन दुखापतीमुळे संघातून बाहेर झाल्याने राहुल त्रिपाठीला संधी मिळाली.” राहुल त्रिपाठीने नुकतंच विजय हजारे ट्रॉफीत त्रिशतक झळकावलं होतं. नव्या वर्षात दुसऱ्याच सामन्यात भारतीय संघात पदार्पण करणारा राहुल त्रिपाठी तिसरा फलंदाज आहे. याआधी शिवम मावी आणि शुभमन गिल यांनी पदार्पण केलं होतं. हेही वाचा : स्मिथला मोडता आला नाही सचिनचा विश्वविक्रम, थोडक्यात गमावली संधी कुठे पाहता येणार सामना? भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या टी 20 सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग प्रेक्षकांना पाहता येऊ शकेल. भारताची प्लेइंग इलेव्हन इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल श्रीलंका प्लेइंग इलेव्हन पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), धनंजय डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कप्तान), वनिंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तीक्षणा, कसुन राजिथा, दिलशान मदुशंका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.