IND vs SA : किंग कोहलीने कॅप्टन्सी जाताच मोडला सचिनचा 'महारेकॉर्ड', पॉण्टिंगही पडला मागे
IND vs SA : किंग कोहलीने कॅप्टन्सी जाताच मोडला सचिनचा 'महारेकॉर्ड', पॉण्टिंगही पडला मागे
Photo-BCCI/Twitter
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या वनडेमध्ये (India vs South Africa) विराट कोहलीने (Virat Kohli) स्वत:च्या नावावर मोठा रेकॉर्ड केला. आतापर्यंत हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर होता.
पार्ल, 19 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या वनडेमध्ये (India vs South Africa) विराट कोहलीने (Virat Kohli) स्वत:च्या नावावर मोठा रेकॉर्ड केला. विराटने जेव्हा 9वी रन पूर्ण केली तेव्हा तो परदेशी जमिनीवर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा भारतीय बनला. आतापर्यंत हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर होता. पण आता विराटने हा विक्रम मोडला आहे. परदेशी जमिनीवर विराटने 147 सामन्यांमध्ये 5065 रन केले, तर विराटने 108 सामन्यांमध्येच हा विक्रम मोडला.
परदेशी जमिनीवर वनडेमध्ये सर्वाधिक रन करणारे भारतीय
विराट कोहली- 108 मॅच, 5,108 रन
सचिन तेंडुलकर- 147 मॅच, 5065 रन
एमएस धोनी- 145 मॅच, 4,520 रन
राहुल द्रविड- 117 मॅच, 3,998 रन
सौरव गांगुली- 100 मॅच, 3,468 रन
विराट कोहलीचं परदेशातलं रेकॉर्ड धमाकेदार आहे. परदेशी जमिनीवर त्याने 58 पेक्षाही जास्तच्या सरासरीने रन केले आहेत, ज्यात 20 शतकांचा समावेश आहे. तर सचिनला परदेशात 12 शतकं करता आली आहेत.
विराटने फक्त सचिनच नाही तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) यालाही मागे टाकलं आहे. परदेशात सर्वाधिक वनडे रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा कुमार संगकारा (Kumar Sangakara) आहे.
परदेशात वनडेमध्ये सर्वाधिक रन
कुमार संगकारा- 5518 रन
विराट कोहली- 5,108 रन
रिकी पॉण्टिंग- 5090 रन
सचिन तेंडुलकर- 5065 रन
विराट कोहली पहिल्या वनडेमध्ये 51 रन करून आऊट झाला. विराटसाठी ही सीरिज महत्त्वाची आहे, कारण टी-20, वनडे आणि टेस्ट कॅप्टन्सी गेल्यानंतर विराटची बॅटर म्हणून ही पहिलीच सीरिज असेल. टी-20 वर्ल्ड कपनंतर विराटने या फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडली, मग बीसीसीआयने विराटला वनडे कॅप्टन्सीवरून हटवलं, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजनंतर विराटने टेस्ट टीमची कॅप्टन्सीही सोडली.
विराटच्या चाहते त्याच्याकडून शतकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 2019 नंतर विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक करता आलेलं नाही. विराटने अखेरचं शतक नोव्हेंब 2019 साली केलं होतं. कोहलीच्या नावावर एकूण 70 आंतरराष्ट्रीय शतकं आहेत.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.