मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : IPL मध्ये दोघांच्या टीम फ्लॉप, पण टीम इंडियात आले Unsung Hero!

IND vs SA : IPL मध्ये दोघांच्या टीम फ्लॉप, पण टीम इंडियात आले Unsung Hero!

बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa T20 Series) टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केली. या सीरिजमधून रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे.

बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa T20 Series) टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केली. या सीरिजमधून रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे.

बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa T20 Series) टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केली. या सीरिजमधून रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे.

मुंबई, 22 मे : बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa T20 Series) टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केली. या सीरिजमधून रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. रोहितच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुलकडे (KL Rahul) टीम इंडियाचं कर्णधारपद सोपावण्यात आलं आहे, तर ऋषभ पंतला उपकर्णधार करण्यात आलं आहे. युवा फास्ट बॉलर उमरान मलिक (Umran Malik) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांची पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये निवड झाली आहे.

जम्मू-काश्मीरचा रहिवासी असलेला उमरान मलिकने या आयपीएलमध्ये त्याच्या वेगाने अनेकांना प्रभावित केलं. आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांमध्ये त्याने एकूण 21 विकेट घेतल्या आहेत. मागच्या आयपीएलमध्ये त्याला फक्त 3 मॅच खेळण्याची संधी मिळाली होती, तेव्हा त्याने 2 विकेट घेतल्या होत्या. 145-150 किमी प्रती तासाच्या वेगाने उमरान सातत्याने बॉलिंग करतो.

पंजाब किंग्ससाठी डेथ ओव्हरमध्ये उत्कृष्ट बॉलिंग करणारा डावखुरा फास्ट बॉलर अर्शदीप सिंग याचीही पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. 2019 पासून तो आयपीएल खेळत आहे. या मोसमात त्याने 13 सामन्यांमध्ये 10 विकेट घेतल्या, तसंच त्याचा इकोनॉमी रेटही 7.8 चा आहे. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 40 विकेट घेतल्या आहेत.

आयपीएल 2022 मध्ये उमरानची टीम हैदराबाद आणि अर्शदीपची टीम पंजाबची कामगिरी निराशाजनक झाली. दोन्ही टीमना प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवता आला नाही, पण या दोन्ही टीमच्या खेळाडूंनी पहिल्यांदाच टीम इंडियात प्रवेश केला आहे. 29 मे रोजी आयपीएल फायनल खेळवली जाणार आहे. यानंतर 9 जूनपासून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5 टी-20 सीरिजला सुरूवात होणार आहे.

दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टीम इंडिया

केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजचं वेळापत्रक

9 जून- पहिली टी-20, दिल्ली

12 जून- दुसरी टी-20, कटक

14 जून- तिसरी टी-20, विशाखापट्टणम

17 जून- चौथी टी-20, राजकोट

19 जून- पाचवी टी-20, बँगलोर

 

First published:

Tags: Ipl 2022, Punjab kings, SRH, Team india