Home /News /sport /

IND vs SA T20 : आयपीएलनंतर आता वर्ल्ड कपची तयारी, आफ्रिकेविरुद्ध अशी असणार भारताची Playing XI

IND vs SA T20 : आयपीएलनंतर आता वर्ल्ड कपची तयारी, आफ्रिकेविरुद्ध अशी असणार भारताची Playing XI

आयपीएल संपल्यानंतर (IPL 2022) आता टीम इंडियाच्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) तयारीला सुरूवात झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 9 जूनपासून 5 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे.

    मुंबई, 2 जून : आयपीएल संपल्यानंतर (IPL 2022) आता टीम इंडियाच्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) तयारीला सुरूवात झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 9 जूनपासून 5 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. या सीरिजसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या खेळाडूंऐवजी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्यांना निवड समितीने संधी दिली आहे. रोहित शर्माच्याऐवजी केएल राहुल टीम इंडियाचा कर्णधार असेल. पहिल्या टी-20 मध्ये भारताला लागोपाठ 13 टी-20 जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. या सामन्यासाठी भारताची प्लेयिंग इलेव्हन कशी असेल, याची उत्सुकता आहे. राहुलसोबत इशान का ऋतुराज? पहिल्या मॅचमध्ये केएल राहुलसोबत (KL Rahul) ओपनिंगला ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि इशान किशन (Ishan Kishan) हे दोन पर्याय आहेत. आयपीएल 2022 मध्ये ऋतुराज आणि इशान किशनची कामगिरी निराशाजनक झाली. लेफ्टी-राईटी कॉम्बिनेशनचा विचार करता राहुलसोबत इशान किशन मैदानात उतरू शकतो. श्रेयस तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीच्या गैरहजेरीत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) तिसऱ्या क्रमांकावर खेळणं जवळपास निश्चित आहे. आयपीएलमध्ये केकेआरचं नेतृत्व करताना अय्यरने 14 मॅचमध्ये 134.56 च्या स्ट्राईक रेटने 401 रन केले. नोव्हेंबर महिन्यात होणारा टी-20 वर्ल्ड कप बघता श्रेयस अय्यरला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. मिडल ऑर्डर-फिनिशर धमाकेदार ऋषभ पंत, दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्या टीममध्ये असल्यामुळे मिडल ऑर्डर आणि फिनिशर मजबूत दिसत आहेत. पंत चौथ्या, कार्तिक पाचव्या आणि हार्दिक सहाव्या क्रमांकावर खेळू शकतो. पांड्या आणि कार्तिक आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये होते. ऋषभ पंतला आयपीएलमध्ये बरेच वेळा चांगली सुरूवात मिळाली, पण त्याला मोठा स्कोअर करता आला नाही. भारतीय टीमने अतिरिक्त ऑलराऊंडर खेळवण्याचं ठरवलं तर अक्षर पटेलला सातव्या क्रमांकावर संधी मिळू शकते. बॉलरचा अनुभव कमी पण आयपीएलमध्ये चमकले भारतीय टीमच्या बॅटिंगच्या तुलनेत बॉलिंगमध्ये अनुभव कमी आहे. फास्ट बॉलर्समध्ये भुवनेश्वर कुमार सर्वाधिक अनुभवी आहे. श्रीलंका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार बॉलिंग केलेला हर्षल पटेलही पहिली मॅच खेळेल हे जवळपास निश्चित आहे. याशिवाय तिसरा फास्ट बॉलर म्हणून आवेश खान, उमरान मलिक आणि अर्शदीप हे पर्याय आहेत. स्पिनरमध्ये आयपीएल पर्पल कॅप जिंकलेला युझवेंद्र चहल याशिवाय रवी बिष्णोई आणि कुलदीप यादव आहेत, पण चहलचं खेळणं निश्चित आहे. टीमने आणखी एक स्पिनर खेळवण्याचा निर्णय घेतला तर तिसऱ्या फास्ट बॉलरऐवजी कुलदीप मैदानात दिसू शकतो. भारताची संभाव्य प्लेयिंग इलेव्हन केएल राहुल, इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, आवेश खान/कुलदीप यादव
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, South africa, Team india

    पुढील बातम्या