मुंबई, 15 डिसेंबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टेस्ट सीरिजपूर्वी उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जखमी झाला. रोहितने दुखापतीमुळे टेस्ट सीरिजमधून माघार घेतली आहे. या टेस्ट सीरिजसाठी रोहितची पहिल्यांदाच टेस्ट टीमचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. रोहित दुखापतीमुळे आऊट झाल्यानं टेस्ट टीमचा उपकर्णधार कोण होणार हा प्रश्न सध्या चर्चेत आहे.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने उपकर्णधारपदासाठी पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेचे (Ajinkya Rahane) नाव सुचवले आहे. टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरमधील बॅटर असलेल्या अजिंक्यनं ही जबाबदारी यापूर्वी बराच काळ सांभाळली आहे. खराब फॉर्ममुळे त्याला या पदावरून दूर करण्यात आले होते. पण, आकाशनं रोहित शर्मा जखमी झाल्यानं पुन्हा एकदा अजिंक्यलाच ही जबाबदारी द्यावी असं मत व्यक्त केले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजमधील कानपूर टेस्टमध्ये विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्यनं टीमची जबाबदारी सांभाळली होती. त्यावेळी टीम इंडियाने विजय जळपास खेचून आणला होता, याकडे आकाश चोप्राने लक्ष वेधले आहे.
BCCI ची भूमिका काय?
विराट कोहली मुंबई टेस्टमध्ये दाखल झाल्यानंतर रहाणेला दुखापत झाल्यामुळे तो ती टेस्ट खेळू शकला नाही. खराब फॉर्ममुळे रहाणेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये खेळण्याची संधी मिळण्याची शक्यताही कमी आहे, त्यामुळे बीसीसीआय उपकर्णधाराची घोषणा करणार नाही.
PAK vs WI: पाकिस्तान क्रिकेटवर नामुश्की, आफ्रिदी, अक्रमने जोडले हाथ!
प्रत्येक टीममध्ये उपकर्णधार महत्त्वाचा असतो. कर्णधार जेव्हा मैदानातून बाहेर जातो किंवा दुखापतग्रस्त होतो, तेव्हा उपकर्णधारच टीमचं नेतृत्व करतो. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात उपकर्णधाराची घोषणा करण्याऐवजी वरिष्ठ खेळाडू किंवा कॅप्टन्सीचा अनुभव असणाऱ्या खेळाडूला ही जबाबदारी देण्यात येऊ शकते. या यादीत आर.अश्विन (R Ashwin) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांचं नाव आघाडीवर आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) टीममधला वरिष्ठ खेळाडू असला तरी त्याच्याकडे टीमचं नेतृत्व करण्याचा अनुभव नाही. त्यामुळे अश्विन उपकर्णधारपदासाठीचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajinkya rahane, Cricket news, Team india