Home /News /sport /

IND vs SA : IPL चे हिरो इंटरनॅशनल मॅचमध्ये झिरो, या तिघांनी बुडवलं टीम इंडियाचं जहाज!

IND vs SA : IPL चे हिरो इंटरनॅशनल मॅचमध्ये झिरो, या तिघांनी बुडवलं टीम इंडियाचं जहाज!

Photo-BCCI

Photo-BCCI

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाची (India vs South Africa 2nd T20) सुरूवात चांगली झाली नाही. आयपीएलमध्ये (IPL 2022) हिरो ठरलेले भारतीय बॉलर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र सपशेल अपयशी ठरले.

    मुंबई, 10 जून : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाची (India vs South Africa 2nd T20) सुरूवात चांगली झाली नाही. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारताचा 7 विकेटने पराभव झाला. टीम इंडियाच्या या लाजिरवाण्या कामगिरीला बॉलर्स जबाबदार होते, ज्यांना 212 रनचं आव्हानही रोखता आलं नाही. या सामन्यात भारताच्या सगळ्याच बॉलरनी रन दिले. अनुभवी फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) 4 ओव्हरमध्ये 43 रन देऊन फक्त 1 विकेट मिळवली. 18 व्या ओव्हरमध्ये तर भुवीने 22 रन दिले. हर्षल पटेलच्या (Harshal Patel) स्पेलमध्येही 43 रनच आल्या, तर स्पिनर असलेल्या युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांची परिस्थितीही तशीच होती. चहलने 2.1 ओव्हरमध्ये 26 आणि अक्षरने 4 ओव्हरमध्ये 40 रन दिले. आयपीएलमध्ये हिरो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या टी-20 मॅचआधी झालेल्या आयपीएलमध्ये (IPL 2022) या भारतीय बॉलर्सची कामगिरी उल्लेखनीय होती. चहलने तर सर्वाधिक विकेट घेतल्यामुळे पर्पल कॅप जिंकली. तर हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि अक्षर पटेल यांनीही आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. पण आयपीएलमधला हा फॉर्म त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखवता आला नाही. टी-20 आंतरराष्ट्रीय मध्ये पहिल्यांदाच एखाद्या टीमने भारताविरुद्ध 200 पेक्षा जास्तच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. भारताविरुद्ध यशस्वी पाठलाग 212 रन : दक्षिण आफ्रिका, दिल्ली, 2022 200 रन : दक्षिण आफ्रिका, धर्मशाला, 2015 193 रन : वेस्ट इंडिज, मुंबई, 2016 या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 211 रन केले. ओपनर इशान किशनने 48 बॉलमध्ये 76 रनची शानदार खेळी केली, तर श्रेयस अय्यरने 36 आणि हार्दिक पांड्याने नाबाद 31 रन केले. दक्षिण आफ्रिकेकडून प्रिटोरियस, पार्नेल, महाराज आणि नॉर्किया यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. या आव्हानाचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने 19.1 ओव्हरमध्येच केला. रस्सी व्हॅन डर डुसेनने 46 बॉलमध्ये 75 नाबाद आणि मिलरने 31 बॉलमध्ये 64 नाबाद रनची खेळी केली. या दोघांनी भारतीय बॉलर्सची धुलाई केली. या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 64 बॉलमध्ये नाबाद 131 रनची पार्टनरशीप झाली. मिलरने त्याच्या खेळीमध्ये 7 फोर आणि 5 सिक्स तर डुसेनने त्याच्या इनिंगमध्ये 5 सिक्स आणि 4 फोर मारले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, South africa, Team india

    पुढील बातम्या