धर्मशाला, 11 मार्च : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधी जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची भीती खेळाडूंना आहे. यामुळेच मालिकवेळी संघाचे खेळाडू चेंडू चमकवण्यासाठी थुंकीचा वापर न करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बराच काळ संघाबाहेर राहिलेल्या भुवनेश्वर कुमारने म्हटलं की, कोरोनापासून वाचण्यासाठी असं केलं जाऊ शकतं. भारतीय संघ गुरुवारी न एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. भुवनेश्वर कुमारने सामन्याच्या पुर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, आम्ही सध्या चेंडू चमकवण्यासाठी थुंकीचा वापर न करण्याचा विचार केला आहे. मात्र हे करू की नाही यावर सांगू शकत नाही. जर आम्ही चेंडू चमकवला नाही तर आफ्रिकेचे खेळाडू आमची धुलाई करतील आणि तुम्ही पुन्हा गोलंदाजांनी चांगला खेळ केला नाही असे म्हणाल.
Due to Coronavirus scare, Indian bowlers might limit usage of saliva for shining ball, says Bhuvneshwar Kumar. #INDvSA #BCCI
— Press Trust of India (@PTI_News) March 11, 2020
संघाच्या बैठकीत जर याबाबत काही आदेश मिळाले तर जो उपलब्ध पर्याय असेल त्यावर विचार करू. हे सर्व संघाच्या डॉक्टरांवर अवलंबून असेल. ते काय सल्ला देतात ते महत्वाचे ठरेल. कठिण अशा काळात प्रत्येकाला सावधगिरी बाळगावी लागेल असं भुवनेश्वर कुमार म्हणाला. आयपीएलबाबत विचारले असता भुवनेश्वर कुमारने त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. भुवनेश्वर म्हणाला की,‘आता याबाबत काही सांगता येणार नाही. कारण कोरोना भारतात पसरत चालला आहे. आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आमच्यासोबत डॉक्टर असून ते काय करावं आणि काय नको त्याबाबत सल्ला देतात.’ हे वाचा : IPL 2020 ला सुद्धा कोरोनाची लागण? IPL रद्द करण्यासाठी मद्रास हायकोर्टात याचिका कोरोना व्हायरसमुळे (corona virus) सध्या जगभरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. IPL 2020 सुद्धा कोरोना व्हायरसमुळे सध्या संकटात सापडलं आहे. कारण IPL 2020 ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. कारण IPL वर बंदी घालण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारीच IPL 2020 चे सामने पुढे ढकलण्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असं म्हटलं होतं. आता याच पार्श्वभूमीवर मद्रास हायकोर्टातसुद्धा याचिका दाखल करण्यात आली आहे. पाहा VIDEO : पुजारा बाद होता पण नियमाने वाचवलं, पंच आणि खेळाडूंमध्ये झाला वाद