• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ : विराट-शास्त्रीच्या जमान्यात संपलंच होतं करियर, रोहितने या खेळाडूला दिली 'संजिवनी'

IND vs NZ : विराट-शास्त्रीच्या जमान्यात संपलंच होतं करियर, रोहितने या खेळाडूला दिली 'संजिवनी'

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs New Zealand) 5 विकेट आणि 2 बॉल राखून विजय झाला. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि आर.अश्विन (R Ashwin) यांनी टिच्चून बॉलिंग करत आणि मोक्याच्या क्षणी विकेट घेत न्यूझीलंडला मोठा स्कोअर करण्यापासून रोखलं.

 • Share this:
  जयपूर, 18 नोव्हेंबर : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs New Zealand) 5 विकेट आणि 2 बॉल राखून विजय झाला. न्यूझीलंडने दिलेलं 165 रनचं आव्हान भारताने 19.4 ओव्हरमध्येच पार केलं. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) 62 रन, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) 48 रन आणि ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नाबाद 17 रनच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला. त्याआधी भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि आर.अश्विन (R Ashwin) यांनी टिच्चून बॉलिंग करत आणि मोक्याच्या क्षणी विकेट घेत न्यूझीलंडला मोठा स्कोअर करण्यापासून रोखलं. भुवनेश्वर कुमारने 4 ओव्हरमध्ये 24 रन देऊन 2 विकेट घेतल्या. मॅचच्या पहिल्याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला भुवीने डॅरेल मिचेलला शून्य रनवर बोल्ड केलं. यानंतर 19 व्या ओव्हरला त्याने टीम सायफर्टला माघारी धाडलं. दुसरीकडे आर.अश्विनने 4 ओव्हरमध्ये फक्त 23 रन देऊन 2 विकेट मिळवल्या. अश्विनने त्याची अखेरची ओव्हर असलेल्या 14 व्या ओव्हरमध्ये चॅपमनला 63 रनवर बोल्ड केलं, तर ग्लेन फिलिप्सला शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. अश्विनला संजिवनी विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या काळात अश्विनच्या मर्यादित ओव्हरच्या करियरला ब्रेक लागला होता. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अश्विनला वनडे आणि टी-20 टीममधून डच्चू मिळाला. यानंतर साडेचार वर्षांनी अश्विनचं टी-20 टीममध्ये पुनरागमन झालं. टी-20 वर्ल्ड कपसाठी अश्विनची भारतीय टीममध्ये निवड झाली, पण पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये अश्विनला संधी देण्यात आली नाही. या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. अखेर तिसऱ्या सामन्यापासून अश्विन प्रत्येक मॅच खेळला आणि टीमलाही सगळ्या सामन्यांमध्ये विजय मिळाला, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती, कारण पहिल्या दोन पराभवांमुळे टीमचं टी-20 वर्ल्ड कपमधलं आव्हान सुपर-12 मध्येच संपुष्टात आलं होतं. इंग्लंड दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्येही विराट-शास्त्रींच्या जोडीने अश्विनला अंतिम-11 खेळाडूंमध्ये संधी दिली नाही. यावरूनही बराच वाद निर्माण झाला होता. टी-20 वर्ल्ड कपमध्ये अश्विनला निवडण्याबाबत रोहित शर्मा आणि टीमचा मेंटर एमएस धोनी आग्रही होते, त्यामुळे अश्विनचं टीम इंडियात पुनरागमन झाल्याचंही बोललं गेलं. आता रोहित शर्माने अश्विनवर विश्वास दाखवला आणि त्यानेही हा विश्वास योग्य ठरवला आहे. रोहित शर्माच्या या निर्णयामुळे अश्विनच्या करियरला मात्र नवसंजिवनी मिळाली आहे.
  Published by:Shreyas
  First published: